सासवडच्या एस.टी.स्टँड समोर श्री. दत्त स्विट मार्ट होलसेल साठी गर्दीचा महापुर आसतो. 3/4 जन माल देत आसतात तर डोक्यावर टोपी लेंगा शर्ट घातलेले श्री. दत्तात्रय मारती क्षिरसागर हासत हासत गल्यावर हिशोब करित असणार. आशा या गर्दीत समाजाचे वधुवर मेळावे वाले समाजाचे मंदिर उभारणार पालखी सोहळावाले, मासिकवाले येणार. या येणार्या बांधवांना क्षिरसागर परत पाठवणार नाहीत आगदी अपेक्षा समजुन घेऊन ती पुर्ण करणार पण परत पाठविणार नाहीत. ही येणार्या बांधवांची खात्री म्हणजे श्री क्षीरसागर स्वत: विषयी प्रसिद्धी स्वत:चे नाव ही नाही फोटो तर दुरच फक्त हवे स्वीट मार्टचे नाव.
श्रीगोंदा तसा आला पाऊस तर हिरवेगार दिसणारे जगण्यापुरती शेती होती जगण्या पुरता घरचा व्यवसाय होता. परंतु 1970 च्या दरम्यान 1972 च्या दुष्काळाचे पांढरे ढग आकाशात फिरत होते. या पांढर्या ढगांनी रोजची भाकरी कठीण होऊ लागली म्हणुन ते आपले मामा सासवड येथील कै. आत्मराम विष्णु कावडे यांच्याकडे आले. इथे मिसरूड फुटताच हॉटेल कामगार म्हणुन राबु लागले चहा कपबश्या उचलने त्या धुऊन ठेवणे ही कामे करू लागले परंतु हे काम संपले तेवढ्यात ही सावली अडगळीत जावु लागली. 1972 च्या दुष्काळात जगने ही कठीण बाब समोर आली. मग जगण्या साठी मजुरी स्विकारली. मजुरी करावयाची पण याच व्यवसायाशी संबंधीत हॉटेल मुळे आचारी कामाची तोंड ओळख होतीच. त्याच बरोबर 4/5 आचारी लोकांची तोंड ओळख होतीच त्यांच्याकडे ते मोल मजुरी करु लागले. यातुन मार्ग काय यातुन पुढे कस जावयाचे हे गणीत सुटत नव्हते. मामांचा सल्ला व अशिर्वाद हीच जमेची बाजु होती. आणि एक दिवस ठरवीले दसर्याकडे मजुरीवर जाण्यापेक्षा आपणच आचारी काम करू या साठी ते उभे राहिले. दोन चार मित्र सोबतीला होते यांचा सल्ला घेतला आणि ते उभे राहिले. लग्न, दहावा किंवा इतर कार्यासाठी आचारी काम करू लागले. इथे कटाक्ष ठेवला फक्त मजुरी घ्यायची जेवणाची चव महत्वाची काम नसेल तेंव्हा तसे राहु पण विश्वास मिळवायचा. यातुन त्यांनी आपल्या भवती वलय निर्माण केले एक प्रमाणिक माणुस आपण प्रामाणिक आहोत. हि बाब सांगुन पाट्या लावुन लोकांना पटत नसते तर ती पटत आसते आपल्या व्यवहारातुन आणि एक वेळ विश्वास बसला आणी एक वेळ रक्तात हे भिनले की आयुष्यभर हेच वृत करावे लागेल.
दत्तात्रय क्षिरसागर ही एक चांगली व्यक्ती हे साठवण ते करू लागले पण 11-6-1987 ला मामा वारले. या परक्या गावात जम बसवता बसवता हा आधार तुटला. त्याच दरम्यान 1988 ला मेहुण्यांचे लग्न झाले. त्यांचा संसार उभा राहिला व्यवसायाला गती आली होती. नफा किंवा तोटा याचा विचार करू नकोस विचार कर प्रामाणिक पणाचा हा मामांचा संदेश उरात बाळगुन ते वावरत होते धंदा साठी जागा असावी वण वण कमी करावी हा विचार होता तोच सासवड स्टॅड नवीन जागेत स्थलांतरीत होणार होते. स्टँड समोर बांधकाम सुरू झाले.बांधकाम मित्राचेच होते त्याला विनंती केली. त्यांने फक्त 10 हजार रूपयात मोक्याची जागा दिली. नवीन जागेत श्री दत्त स्विट मार्ट सुर केले. तो काळ 1991 चा होता दुकानाला गिर्हाईकच नाही सकाळ पासुन राब राबुन मजुरी ही मिळत नव्हती ही एक चुक झाली का असे ही वाटत होते. पण जिद्द सोडली नाही धडपड व सातत्य टिकवले त्यामुळे 2 वर्षात स्विट मार्टला गिर्हाईकांची वर्दळ सुरू झाली. होलसेल फरसाण व स्विट मालाचे गिर्हाईक वाढले. रहावयास घर नव्हते. लहानाची मोठी मुले झाले मुली लग्नाला आल्या. त्यांची लग्न लावणे स्वत:ला घर उभारणे ह्या जबाबदार्या पुर्ण करू लागले श्री. अमोल व इतर नातलगांनाही जीवनात उभे केले आज 3 दुकाने उभाी केली 4/5 घरे ही उभारली या सर्वात सौ चंद्रभागा यांची साथ सोबत ते मोलाची मानतात.
दुष्काळ हे एक वरदान माणुन पिचुन, खचुन, कालमडुन न जाता त्या दुष्काळाला टक्कर देऊन श्री. क्षिरसागर उभे राहिले मजुरी करता करत एक प्रमाणिक एक प्रतिष्ठीत व एक दानशुर म्हणुन आपली यशस्वी वाटचाल करू शकले त्यांच्या वाटचालीस अभिनंदन