एका महानगर पालीकेतील कर्मचार्याला ओबीसी संघटनेत या म्हंटले बाबारे नोकरदार मंडळी ओबीसी चळवळीत यावीत तेंव्हा ते म्हणाले. हे शक्य नाही 96 कुळींचीच कामगार संघटना 96 वाल्यांचीच राजकीय सतत. 96 वालेच अधीकारी. 96 वालेच झालेत ओबीसी. आता आम्ही झालोय किडूक मिडुक जर समजा आम्ही तुमच्या बरोबर आलो तर हे 96 कुळी वाले आमच्यावर खोट्या केसेस टाकून रोजची भाकरी बंद करतील. गाव गाड्यात जे जगत होतो त्या ही पेक्षा कठिण जगने आले आहे. हा 96 चा अकडा आणि साडेतिन ब्राह्मणशाही आपला कर्दनकाळ आहे. हे प्रथम या साठी मांडले त्याला कारण आसे. हे ओबीसी बांधव जे आहेत त्यांना मी गेली 25 वर्ष जवळुन पहातोय एक तडफदार व्यक्ती स्पष्ट बोलून वावरने ही सवय यातून अनेक वादळे अंगावर घेणार. परंतू 96 वाले म्हणताच बिळात उंदरा सारखे लपण्यात समाधान माणनारे मला 96 वाले हा शब्द त्यांनीच दिला. साडेतीन टक्के हा आकडा घातक तसा हा 96 सुद्धा हे ते खाजगीत सांगतात वरिल किंवा आशा प्रकारे मते हजारो जन दबकत दबकत मांडतात. ही एक जगण्याची भीती ते व्यक्त करतात. आशा लाखो बांधवाना जागे करणे ही माझी आयुष्याची वाटचाल.