कै. सावळेराम गुंडीबा देवकर, देवकर घराण्यात प्रसिद्ध. त्यांना एकच मुलगी व तिला देखिल मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी वुईलपत्र केले की, तेली समाजास माझ्या मुलींच्या निधनानंतर ती जागा समाजाने ताब्यात घ्यावी व त्या ठिकाणी मंदिर बांधावे. त्याप्रमाणे त्यांच्या निधनानंतर समाजाने मंदिर बांधले. आज त्या ठिकाणी धार्मिक प्रवचने होतात. वर्षांतून पाच-सहा वेळा जन्मोत्सव व पूण्यतिथी साजरी केली जाते व भंडारा घालण्यात येतो.
ते शंभर वर्षांचे होते. प्रकृती उत्तम होती. समाज त्यांच्या जागेचा उपभोग घेऊन तसेच इतरांनाही होत असे. समाज त्यांचे बदल ऋणी आहे.