औरंगाबाद - माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी गेल्या मंत्रिमंडळात फलोउत्पादन व रोहोयो कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले,आपल्या उच्च शिक्षणाच्या व अनुभवाच्या जोरावर शिवसेना पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेततळ्याचे अनुदान वाढून दिले,ओला दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या, पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, ही खात्री करून दिली प्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळाले पाहिजे, अवघ्या सहा महिन्यांच्या काळात रस्ते, रास्त रेशन कार्ड, दलित वस्तीचा विकास, मराठवाड्याचा कायमचा पाण्याचा दुष्काळ कायमचा जावा म्हणून पावसाळ्याचे पाणी वाहून जाण्यापेक्षा ते पाणी मराठवाड्यात कसे आणता येईल याची दूरदृष्टी जयदत्त क्षीरसागर यांच्या कडे होती ती पावले त्यांनी मागच्या मंत्रिमंडळात उचलली, प्रश्न, ओबीसींचे प्रश्न सर्व सम जाचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करणारा एकमेव नेता.ओबीसींच्या प्रश्नासाठी दिल्लीत मेळावा घेऊन,आपल्या मागण्या केंद्र सरकार कडे मांडल्या. अश्या नेत्याला शिवसेना पक्षाने न्याय दिला पाहिजे, आणि पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिमंडळात सामील करून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे सोमनाथ सुरडकर संस्थापक अध्यक्ष जय संताजी युवा मंच, तेली समाज महाराष्ट्र चांगदेव हिंगे, संतोष पवार, रामेश्वर क्षीरसागर, रवि लुटे, विक्रम जाधव, मुकेश सुरडकर, संजय पंडित, शुभम राऊत, नंदकुमार गवळी, एकनाथ हिरे, संजय वाढेकर, आकाश खुळे, अजय शिंदे, आकाश ठोंबरे, प्रदीप शिंदे, सुधीर सुरडकर, श्याम क्षीरसागर, उन्मेष मालोदे, अरुण धांडे, दत्ता सोनवणे यांच्या तर्फे करण्यात आली आहे.