पौड - मुळशी तालुक्यातील या गावाला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र पुर्व काळात व स्वांतत्र्यात ही तेली समाजाने गावाचे व तालुक्याचे नेतृत्व केले आहे. गावची पाटलकी समाज बांधवाकडे आसते. श्रीमती जनबाई इप्ते ह्या जि.प. चया सभापती होत्या. सौ. उज्वला पिंगळे ह्यां तालुका सभापती होत्या. सरपंच, उपसरपंच पद समाजाकडे अनेक वर्षे होते व आहे. परंतु डोगराळ भागातील समाजाचे संघटन खरावेडे येथून होत होते. यात सुसुत्रता यावी व बांधव मध्यवर्ती ठिकाणी सलग्न व्हावेत या साठी महाराष्ट्र तैलीक महासभे तर्फे सहविचारसभा घेण्यात आली. या साठी महाराष्ट्र प्रातिक महासभा उत्तरचे अध्यक्ष श्री. महादेव फल्ले यांच्या नेतृत्वाखाली श्री. प्रकाश गिधे उपाध्यक्ष श्री. सत्यवानशेठ कहाणे जेष्ठ बांधव श्री. गजानन घाटकर गेले होते सुसंवादातून संघटनेला दिशा मिळेल असे श्री. प्रकाश गिधे कळवितात.