वाडा संस्कृती ही काँग्रेसची मक्तेदारी होती. स्वातंत्र्या नंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय या नावा खाली नांदत होती. वावरताना मराठा समाजाच्या उच्च व कमी पोटजाती एक झाल्या स्वातंत्रयात त्या सत्तेसाठी एकत्र आल्या. कसेल त्याची जमिन कायदा ही केला. म. गांधीना गोळ्या मारल्या नंतर ब्राह्मणांचे वाडे उद्धवस्त झाले. आणि देशोधडीस गेलेल्या ब्राह्मणांच्या मालमत्तेचे हेच वहिवाटदार झाले. गावच्या माळी, सुतार, लोहार, शिंपी, गुरव, तेली, साळी, धनगर, परिट आशा जाती टाचे खाली आल्या या जातींना स्वातंत्र्याने मतांचा अधीकर दिला. परंतु स्वातंंत्र्याचा अधीकार हिसकावुन घेतला. सत्ताधीश मराठा विरोधक मराठा. मत न दिल्यास गावात रहाण्याचा अधीकार संपुष्टात येत होता. सत्तेत सहभाग घेऊ पहाताच तिरकी वाट लावत होती. देशोधडिस गेलेल्या ब्राह्मणांनी शहरे आपली केली. या शहरावरून आपला नवा रस्ता निर्माण केला. आपन राजकारण करू शकत नाही आपण साडेतीन टक्के विरोध करू शकत नाही. आशा वेळी ब्राह्मण्याने पछाडलेल्या मंडळींनी सेनेतुन भुजबळ, भाजपातुन मुंडे समोर ठेवले त्यांना बळ दिले. यांनी आपले जात समुह जागे केले. या दोन ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या वाडा संस्कृतीला खिंडार पाडले. 1977 च्या दरम्यान पहिला हादरा दिला. याच दरम्यान मंडल आयोग नेमला ब्राम्हण प्रथम जागे झाले. त्यांनी जय प्रकाश नारायणांची क्रांती मोडीत काढत भाजपा निर्माण करून मंडलला समर्थन म्हणत कमंडलला रथ यात्रेत बसवले. अनेक ओबीसी तरूणांना नेते बनवले. ही मंडळी कमंडलला डोक्यावर घेत बाबरी उध्वस्त करू लागले. या बळावर आडगळीत ठेवलेल ब्राह्मण्य सत्ेत गेले. सत्तेत जाताच एक एक करीत ओबीसी नेता कुचकामी केला. हे करण्यासाठी बर्याच वेळा ब्राह्मण्य व क्षेत्रीय जाती अंधारात एकत्र होत्या. यातूनच काम संपताच ही मंडळी बाजुला केली. आपले मिळालेले मोठे पण आपल्याला मिळालेली सत्ता व आपन यात यांनी स्वत:ला मोठे केले. समाजाचा विचार यांना सुचलाच नाही. सत्तेत जाताना जातीची आठवण व सत्तेत जाताच जातीचा तिटकारा. या बाबत मी एका माजी जिल्हा परिषद अध्यक्ष्यांना विचारले तेंव्हा सत्ता गेल्यावर सांगितले तुम्हाला मोठे आम्हीच केले. तेंव्हा हे मोठे पण मिरवा इतरांचे पहाल तर सत्ता जाईल. इतका प्रामाणिक पणा वरून सुर होऊन खाली पर्यंत झीरपत आलेला आहे. याला विरोध करावा तर खोट्या केसेस, खोटे आरोप खोटा भ्रष्ट्राचार उभा करून बदनामींचे मालक होण्या पेक्षा आपले आपन पाहू ही प्रणाली ओबीसींना मारक ठरली.