मेहकर : संताजी कॉन्व्हेंटमध्ये महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा घाटावरील कार्यकारिणी व महिला घाटावरील कार्यकारिणों गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे व महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णूपंत पाखरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मेहकर तालुकाध्यक्ष डॉ.गंगाधर क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष अॅड.संतोष राजबिडे, सचिव संतोष डोवळे, सहसचिव संतोष चोपडे, कोषाध्यक्ष डॉ.दिगंबर हाडे तसेच सदस्य नंदकिशोर गायकवाड, सतीश गायकवाड, राजाभाऊ राऊत, गजानन इंगळे, शकुंतला महाकाळ, महादेव पाखरे, अॅड.गोपाल पाखरे, सुनील नालीदे, जिल्हा प्रसिन्दिप्रमुख नंदकिशोर पाखरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय सखाराम देव्हडे यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांच्या अध्यक्षतेत मेहकर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये तालुकाध्यक्षपदी शिवानी डोंगरे, उपाध्यक्षपदी वंदना गायकवाड, सचिव सीमा तडि तर सदस्यांमध्ये सुरेखा वन्हाडे, चंदा वाळके, संगीता इंगळे, जया राऊत, जया पोघाडे, शारदा सरोदे, गंगा लोखंड, रुख्मिना सोनटक्के, विद्या तायडे, सुनीता पाखरे, मनीषा राजबिंडे, डॉ.वैशाली क्षीरसागर यांचा समावेश आहे. यावेळी कार्यक्रमाला विशाल डोंगरे, गणेश शिवाजी इंगळे, संतोष शिंदे, केशव व सोनुने, गजानन सोनटक्के, गणेश व्यवहारे, सुधाकर महाकाळ सिंदखेडराजा यांची उपस्थिती होती.