मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
माझे मित्र दत्ता सामंत यांच्या लढ्यात लढलेले बांधव. गिरणगावात उध्वस्त होताच गावात स्थीर झाले. जमेल तो उद्योग करीत प्रतिष्ठीत बनले. आपले ओबीसी पण जिवंत ठेवत ग्रा. पंचायतीसाठी उभे राहिले. समोर उभा गावचा पाटील त्याची पाटीलकी, त्याचे मराठा पण त्या समोर अव्हान उभे राहिले. त्या वार्डात 75 % ओबीसी असतानाही जातीवंत ओबीसी असतानाही पाटला समोर पालापाचोळा झाला. पाटलाला अव्हान देतो म्हणताच व्यवसाय अडचनीत आला खोट्या केसेसचा फेरा सुरू झाला. त्यांची शोचनीय अवस्था पाहुन सर्वच ओबीसी इतके खचले, इतके पिचले की 96 कुळी पाटालालाच आपला ओबीसी समजु लागला. ही शोकांतिका परवाच्या निवडणूकीत जवळ जवळ सर्व ठिकाणी समोर आली. मराठा समाजाची ही दहशतवादी कार्यवाही प्रतिष्ठेत बनली आहे. गावात रहाण्यासाठी रोजची भाकरी मिळवण्यासाठी खचलेला ओबीसी गलीतगात्र आहे. सत्याची साठवण आशाी मंडल नेमताच ब्राह्मण्याने त्याला गाडण्यासाठी पहिले कमंडलला रथात बसवले ओबीसी तरुणांची फौज संरक्षणाला ठेवली. त्याच प्रमाणे त्यांना संलग्न असलेल्या काही मराठा मंडळींनी आपली मराठा संघटना बनवुन प्रसंगी रस्त्यावर उतरून ओबीसींना प्रखर विरोध केला. ठाकरे घराण्याने तर आरक्षण प्रणालीला कडाडून विरोध केला. प्रत्येक राजकीय पक्षाचे प्रमुख हे मराठा किंवा ब्राह्मण असल्याने त्यांनी तु ओबीसी आहेस मग तुला आरक्षण मीच देतो मीच निवडुण आणले तो आता गप्प गुमान सत्तेत जाऊन मराठा व ब्राह्मणांची चाकरी करण्यात आरक्षणाची प्रतिष्ठा समजु लागला. लुळे पांगळी केलेली सत्तेतली ओबीसी मंउळी ज्या जातीत जन्म घेतला त्या जाती पासुन फटकुन राहू लागली. जातींचा विकास व्हावा ही तर आरक्षणाची वाटचाल तीच प्रथम बंद केली. याच वेळी काही मराठा मंडळी सावध झाली. त्यांनी ओळखले विरोध करण्यापेक्षा आपणच त्यांचे फायदे घेऊ या साठी रस्त्यावरचा संघर्ष उभा केला. साध्या दुध डेअरी पासुन सर्व सत्ता स्थाने उपभोगणारा मराठा. आज पर्यंत सर्वाधीक आमदार व खासदार आसणारा मराठा स्थानिक स्वराज्य संस्थेत खंबीर असलेला मराठा. सहकार प्रणालीत फोफावलेला मराठा शिक्षण संस्थेचा मालक मराठा. सहन करू शकत नव्हता गावचा पाटील, गावचा सरपंच, तालुक्याचा सभापती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, तेली, माळी, सोनार, कासार, शिंपी, लोहार, परिट, नाभिक, आशा जातीत जन्मलेला आहे. यातुन संघर्ष उभा केला. याच दरम्यान दलितात जन्मलेले सुशिलकुमार शिंदे मुख्यमंत्री असतना या महाशयांनी एका पत्रका द्वारे मराठा-कुणबी ही नवी जात अस्तीत्वात आणून आपले राजकीय स्थान भक्कम करून खर्या ओबीसींच्या डोक्यावर 96 कुळी मराठा बसवले. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद वाक्य बेंदराच्या बैलाला चिकटवलेले बेगड आसते हे सिद्ध केले. यावर शांतन बसता सगळाच आरक्षणाचा गठ्ठा आमचाच म्हणत ही मंडळी रस्त्यावर उतरली. रस्त्यावरील त्यांचा आवतार पाहून ओबीसी हात बांधुन गप्प बसला. संवीधान काय सांगते याची फिकीर नाही. अनेक आयोगांनी नकार दिला तरी आम्ही सांगतो तेच करा हा हेका ठेवला. सत्तेतील व विरोधातील मराठा पक्ष विसरून मराठा एकाच शब्दा साठी नेहमी एक असतात. या देशातील ब्राह्मण समाज हा एक असतो. तो जास्ती जास्त आर.एस.एस। च्या माध्यमातुन आसतो. या ब्राह्मण समाजा विषयी विस्ताराने पुढे पाहु हेच तत्व क्षत्रिय जातींनी घेतले आहे. जाट, पटेल, मराठा, त्यांचे आज हेच तत्व आहे. त्या त्या राज्यात पुर्वी एक हाती सत्ता होती. मंडल आयोगाने ती खिळखिळी झाली. या साठी मंडलला प्रखर विरोध याच जातींचा होता. आम्हाला ओबीसी म्हणुन हाक्क मागणार्या याच जाती आज रस्त्यावर आहेत. हे का ? कश्या साठी ?