मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
परवा झालेल्या ग्रा. प. निवडणूकीत खरा ओबीसी उंबर्या आड लपुन बसण्यात समाधान मानु लागला. गावचा पाटील, गावचा देशमुख ओबीसी म्हणुन निवडणूकीस उभा राहिला त्याने आपल्या जातीच्या, पैशाच्या बळावर अक्षरशहा खर्या ओबीसींचा पालापाचोळा केला. जे आपवादाने निवडुन आलेत. तेच मुळात आपल्या बळावर ही वास्तवता आहे. या विषयी तक्रार करावी तर गावात जगता येणार नाही साधा ब्र काढला तरी जगने मुशकील ही मागील पनावरून पुढे चालु आहे. कोर्टात जावे तर पैसा कमी पडतो लढाई लढावी तर कोर्टात पळवाट शोधत पाच वर्ष सहज जातात. त्या पेक्षा आहे तेच पहात रहावे. ही शोकांतिका मानव आयोगाला कळेल तेंव्हा कळेल. शैक्षणिक प्रवेश घ्यावा तर आपल्या आगोदर मराठ-कुणबी हाजर. शिक्षण सम्राट यांचेच त्यांनी त्यांचे प्रवेश पुर्ण करावेत पैसा घ्यावा तर आणावा कोठुन हा यक्ष प्रश्न समोर येतो त्या पेक्षा शिक्षण नकोच. शासकीय नोकरीत तिच आवस्था शैक्षणीक क्षेत्रात अनेक पळवाटा शोधल्यात. लायक उमेदवार नाही म्हणुन त्या जगेवर इतर मराठा - कुणबी प्रमाणपत्र मिळताच ओबीसी राखीव कोटा भरला जातो. ही वास्तवता आज प्रत्येक ठिकाणाी समोर येत आहे.