हडपसर - श्री संताजी तेली समाज संघटना व श्री संताजी सेना हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हडपसर येथे महिलांसाठी संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा, टिकली लावणे स्पर्धा घेण्यात आल्या.
यात सुमारे १०० महिलांनी यात सहभाग घेतला. निशा करपे व रूपाली केदारी यांनी या स्पर्धेचे संयोजन केले. अलका रायजादे, सोनाली शेलार व छाया बारमुख यांनी मानाची माहेरची साठी पुरस्कार पडकाविला. जनसेवा बँकेच्या फुरसंगीचे शाखाधिकारी सुरेश अत्रे व त्यांच्या सहकार्यांनी उपस्थित महिलांना बँकेच्या विविध बचत योजनाची माहिती दिली.
संताजी सेनेच्या हडपसर शाखेच्या कार्यकारिणीची नियुक्तीपत्रे सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज यांनी यावेळी वितरीत केली. संताजी सेना हडपसर शा,ेचे अध्यक्ष सूर्यकांत बारमुख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतम केदारी, अरूण भिसे, रमेश डाफे, श्याम भगत, नानासाहेब लोखंडे, विजय फल्ले, गोपाळ दळवी, दीपा व्यवहारे मंगल शेलार, गीतांजली व्हावळ व उज्वला शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी संताजी सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रामदास धोत्रे, प्रसिद्धीप्रमुख दिलीप शिंदे, उपाध्यक्ष अनिल उबाळे, सचिव अनिल घाटकर महिलाध्यक्षा निशा कारपे, सचिव कमल सुपेकर, संघटक रााधिका मखामले, सुलोचना लोखंडे, कमल देशमाने शिला लोखंडे, रोहिणी राऊत मांजरेकर, दौंड तालुकाध्यक्ष गणेश चव्हाण व संताजी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रत्नाकर दळवी उपस्थित होते.