पुस्तिकाचे 'सोयरीक २०२०' असे नामकरण करण्यात आले आहे. ‘सोयरीक २०२०' च्या प्रचारासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करीत असून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये परिचय फॉर्मचे वितरण करण्यात आले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्याचे ठराविक ठिकाणी फॉर्म जमा करण्याचे केंद्र ठरले असून त्या ठिकाणीच फॉर्म भरून देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. वधू-वर परिचयसाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रकाशित केले असून त्याची झेरॉक्स कॉपी देखील चालणार आहे. असे आयोजकांनी कळवले आहे.
धुळे शहरामध्ये फॉर्म जमा करण्याचे केंद्र कैलास दुग्धालय, २९२६, चैनी रोड कॉर्नर, धुळे हे असून अधिक माहितीसाठी मंडळाच्या पदाधिकारींशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आलेले आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १० नोव्हेंबर, २०२० असून 'सोयरीक २०२०' ही पुस्तिका रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रविंद्र जयरा चौधरी यांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade