श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबई - शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना 2020
दि. 17-10-2020 दरवर्षी आम्ही हे प्रसिद्धीपत्रक छापील स्वरूपात महाराष्ट्रातील प्रत्येक सामाजिक संस्थांना पोस्टाने अथवा कुरियरने जुलै महिन्यातच पाठवत असतो. यावर्षी आलेल्या कोविड-19 च्या आपत्तीमुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्यामुळे हे पत्रक आपणांस उशिरा व अशा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देत आहोत.
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्राच्या विविध भागातून खालील प्रकारच्या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1) वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
2) केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या Common Entrance Exam for All India Services साठी IAS, IPS इ. उच्च श्रेणीच्या पदासाठी होणाऱ्या प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊन अंतिम निवडीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार.
3) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यस्तरीय प्रथम श्रेणीच्या (Deputy Collector/Dy. S.P./Dy. Registrar इ.) प्राथमिक परिक्षातील उत्तीर्ण विद्यार्थी.
4) भौतिक (Physics), रासायनिक (Chemistry), गणित (Mathamatics) अथवा संशोधनात्मक (Phd.) अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी
5) चार्टर्ड अकाउंटंट (CA), कॉस्ट अकाऊंटंट (ICWA), चार्टर्ड फायनान्स ऍनालिसिस्ट (CFA), कंपनी सेक्रेटरी (C.S.), हुमन रिसॉरसिस (H.R.D.) इ. अभ्यासक्रमाची प्राथमिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
6) महाराष्ट्रातील ख्यातनाम महाविद्यालयात कमर्शियल आर्ट, फाईन आर्टस् इ. च्या विविध शाखांत प्रवेश मिळवून पदवी/पदविका अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी, प्रतिवर्षी प्रमाणे वरील विषयांपैकी क्र. 1 द्वारे येणाऱ्या अर्जाची छाननी करून निवड झालेल्या विद्यार्थ्यास वार्षिक रु 10,000/ या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाईल व त्या विद्याथ्यनि आपला शैक्षणिक स्तर समाधानकारक राखल्यास त्याला, त्याच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल.
क्र. 2 ते 6 मध्ये निर्देशिलेल्या अभ्यासक्रमासाठी आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांनी निवडलेला अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, त्यासाठी लागणारी आर्थिक गरज व विद्यार्थ्याची आर्थिक निकड या सर्व बाबींचा फौंडेशनच्या शिक्षणतज्ज्ञ व मार्गदर्शक यांच्या विचारविनिमयाने शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी निश्चित केली जाईल व ती रक्कम विद्यार्थ्यास दिली जाईल.
सदर निवड फौंडेशनच्या शिक्षण समितीमार्फत निःपक्षरित्या केली जाते. निवडीबाबतचा समितीचा निर्णय अतिम समजून त्याप्रमाणे शिष्यवृत्ती वाटपाची कार्यवाही केली जाते.
अर्जाची प्राथमिक छाननी द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधून मुलाखत घेतली जाऊ शकते. त्यानंतर अतिम निवड करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक विद्याथ्र्यान अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा व्हाट्सएप नंबर ईमेल ऍड्रेस इ. सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे.
आपल्या परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या विभागातील गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची माहिती व्हाट्सऍपद्वारे जरूर द्यावी ही विनंती.
सध्या बऱ्याच कुरियर सेवा व पोस्टल सेवा पूर्ण कार्यक्षमतेने चालू नसल्याने आपले अर्ज स्पीडपोस्टानेच पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2020 आहे. शिष्यवृत्ती साठी अर्ज भरून पाठवण्याचा पत्ताद्वारा: श्री प्रभाकर संतू कोते - विश्वस्त बी- 26, श्री सद्गुरू को-ऑप. हौ. सोसा. 90 फूट रोड, भांडूप गाव, भांडूप (पूर्व), मुंबई 400042 मोबाईल नंबर 9821431718
आपले स्नेहांकित डॉ. शाम शिंदे शंभू मुरारी तेली (चेअरमन)(मॅनेजिंग ट्रस्टी)
अर्जासंबंधी नियम
१) सदर अर्जमावर्षी वि./५-१२-२०पर्यंत श्री शनैश्वर फौंडेशनने जाहिर केलेल्या पत्त्यावर पोहोचेल याची काळजी घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील.
२) अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती अत्यावश्यक आहेत,
अ) रहात असलेल्या स्थळाबाबत पुरावा. १) रेशनिंग कार्डाची प्रत २) इलेक्ट्रीक बिलाची प्रत ब) दहावी, बारावी व गेल्या शैक्षणिक वर्षात दिलेल्या परीक्षांच्या गुणपत्रकाच्या प्रमाणित प्रती. क) मागासलेल्या जाती / जमाती अथवा इतर मागासलेल्या जातीपैकी (s.c., S.T..O.B.C.) असल्यास, त्याबद्दल तहसीलदार (कलेक्टर) किंवा तत्सम अधिकाऱ्या कडून मिळालेल्या जातीच्या दाखल्याची प्रमाणित प्रत व नॉन क्रिमी लेयर बाबतचे प्रमाण पत्र, ड) व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळाल्यासंबंधीच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत (बोनाफाईड सर्टिफिकेट) इ) पालकाच्या उत्पन्नाबाबत नोकरीत असल्यास कंपनी/संस्था/शासन यांच्याकडून किंवा व्यावसायिक असल्यास शासकीय दाखल्याची प्रमाणित
प्रत.
फ) आपणांस शिष्यवृत्ती आवश्यकता का आहे? या विषयीचे विद्यार्थ्याचे एका कोऱ्या कागदावर थोडक्यात निवेदन. ग) आपल्या विभागातील एका प्रतिष्ठीत समाजबांधवाचे संर्दभपत्र / शिफारसपत्र अर्जा सोबत सादर करावे.
३) अर्जासोबत जोडलेली प्रमाणपत्रे, गुणपत्रके इ. च्या प्रती मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्रमुख अथवा राजपत्रित अधिकारी ह्यांच्या सही शिक्यानिशी
प्रमाणित केलेल्या असाव्यात. कोणत्याही प्रमाणपत्राच्या मूळ प्रती मुद्दाम मागणी केल्याशिवाय पाठवू नयेत. त्या गहाळ झाल्यास, त्यास श्री शनैश्वर फौंडेशन जबाबदार नसेल. वर उल्लेखलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती शिवाय अर्ज आल्यास तो अर्ज अपूर्ण समजला जाईल व तो छाननी करताना विचारात घेतला जाणार नाही.
अर्जातील माहितीच्या सत्यतेबाबत प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चौकशी व फेरतपासणी करण्याचा अधिकार श्री शनैश्वर फौंडेशनला राहिल. आवश्यकता भासल्यास अर्जदाराकडून काही अधिक माहिती मागवली जाईल व ती अर्जदाराने त्वरीत दिली नाही तर, त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
५) अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचा निर्णय हा सर्वस्वी श्री शनैश्वर फौंडेशनचा असेल व तो अंतिम राहील. त्याबद्दल कसलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास त्यांच्या प्रत्येक सत्रात होणाऱ्या परीक्षेची गुणपत्रिकेंची प्रमाणित प्रत त्वरीत श्री शनैश्वर फौडेशनला पाठविण्याची जबाबदारी स्वतः पार पाडावी लागेल. त्यानुसार त्याची शैक्षणिक प्रगती समाधानकारक न वाटल्यास शिष्यवृत्ती थांबविण्याचा अथवा रद्द करण्याचा सर्वाधिकार श्री शनैश्वर फौंडेशनकडे राहिल व त्या बाबतीत श्री शनैश्वर फौंडेशनचा निर्णय अंतिम असेल.
शिष्यवृत्तीच्या अर्जासंबंधीच्या पत्रव्यवहाराचा पत्ता
श्री. प्रभाकर संतु कोते - विश्वस्त-श्रीशनैश्वर फौंडेशन बी/२६, श्री सतगुरु को. ऑप. हौ. सोसायटी, ९० फूट रोड, भांडूप गांव, भांडूप (पू.), मुंबई - ४०००४२., मोबाईल : ९८२१४३१७१८ डॉ.शाम शिंदे, चेअरमन - श्री शनैश्वर फौंडेशन, मोबाईल : ९८६९१८६५४९