नायगाव, नांदेड दि. १२ - संत संताजी जगनाडे महाराजांची शासकीय जयंती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात साजरी केली नसल्याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी केली आहे.
नायगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि.८ डिसेंबर रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांची शासकीय जयंती शासन परिपत्रकानुसार व शासन निर्णयानुसार साजरी करणे बंधनकारक असताना तालुका कृषी अधिकारी नायगाव यांनी जाणून-बुजून रजा टाकून जयंती साजरी केले नाही असे चौकशी अंती कळले असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.या प्रकरणात दोषी असणारे तालुका कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा तेली समाज संघटनेच्यावतीने जिल्हा कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा रामकिशन पालनवार यांनी निवेदनातून इशारा दिला आहे.
तालुका कृषी अधिकारी शिंगाडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला असता ते म्हणाले की मी दौऱ्यावर असल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना श्री संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी करावी अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या शासन नियमांचे पालन करून जयंती साजरी केली असे सांगितले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade