मोहन देशमाने,उपाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ
मराठा हे आमचे भाऊ आहेत. पण मराठा पण उरात बाळगुन जे अन्याय करतात ते आमचे भाऊ होऊ शकत नाहीत. कारण या मंडळींनी आपल्या भावकीचा विकास होऊ दिला नाही. सत्ता स्वत: भवती राबवली. गावचा सरपंच,पाटील, तेली, तांबोळी, गुरव आशा जातीचा नको या साठी या मंडळींचा प्रखर विरोध नंतर लबाडी सुरू करून या देशाची संवीधान दुर केले आहे. या विषयी जो कोण आवाज उठवेल त्याला साम दाम भेद या मार्गाने संपवणे याचे जिवंत उदाहरण आपण जागो जागी पहातो. याची खरी सुरूवात ब्राह्मण्या पासून सुरू होते मंडलला प्रखर विरोध करून कमंडलला प्रतिष्ठित करून एक मानसिकता निर्माण करणे आपण हिंदू आहोत तसे पाहिले तर 52 टक्के ओबीसी मध्ये 44 टक्के हिंदू ओबीसी आहेत. त्यांचा विकास थांबवणारे हिंदू धर्माचे ठेकेदार ब्राह्मण्यच आहे. त्यांना जर ओबीसी जागा झाला तर त्यांना समुळ नष्ट करेल ही भिती वाटते. यातुनच आनेक सदगुरू, आम्मा, बापू यांचे तांडे देशभर संचार करतात सर्व दु:खाचे निवारण हेच करणार सर्व सुख हीच मंडळी बहाल करणार एवढी गुलामगीरी यांनी लादली आहे. या गुलामगीरीतून विचार प्रक्रियाच गोठली जावू लागली. संघर्षाची धार बोथट होवू लागली या देशाच्या संवीधानाने जे दिले ते हिसकावुन घेण्यापेक्षा या सदगुरू, अम्मा बापु यांच्या भजनी लागुन मिळू शकते हा अन्याय आज प्रतिष्ठेचा झाला आहे. जे दिले ते या जन्माचे भोग जे मिळाले ते आमच्या मुळे ही मानसिकता उद्या या देशाच्या संविधानाला ही बाजुला सारू शकते यावाटेवर ओबीसी घेऊन जाने इतकी वाटचाल ओबीसी साठी राखीव केली जात आहे. हा उद्याचा अन्यायी महामार्ग आहे. आसे प्रकार इतिहासात मंडळींनी केलेत. जेंव्हा जेंव्हा आसे रस्ते निवडलेत त्या वेळी या देशावर परकीय राज्य करू शकलेत. कारण या देशाची खरी ताकद बहुसंख्य ओबीसी लोकसंख्येत आहे.