देऊळगावराजा : श्री संत संताजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या मुळगावी संदूबरे जिल्हा पुणे येथे फार मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात येत असतो. अख्ख्या महाराष्ट्रातील समाज बांधव दर्शन चा लाभ घेत असतात. परंतु यावेळी कोरोनासारख्या महामाारीने मानवतेलाच नाही घेरले तर भगवंताचे दारेही बंद केली. तर याची दखल व काळजी घेण्यासाठी काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित संताजी महाराजांची जयंती साजरी केली. यासाठी नागपूर येथून विदर्भातील युवक आघाडीचे अध्यक्ष सुभाष घाटे व काही समाज बांधव संदूबरे येथे गेली होती . देळऊगावराजा येथील सुषमा राउत यांच्या निवासस्थानी भेटी दरम्यान समाजाशी बोलत होते. मोजक्या प्रमाणात व शासन नियम पाळून उत्सव साजरा करत असताना घाटे यांनी अनेक ठिकाणी समाज बांधवांच्या भेटी घेउन समाजाविषयी तळमळ व युवक महीला यांच्या मध्ये जनजागृती व्हावी याची चचाँ केली.
तर समाजाची जनगणना व्हावी याविषयी प्रभोधन केले .तर प्रत्येक घरात व शासकीय कार्यालयात जयंती साजरी झाली पाहीजे असे सुद्धा प्रतीपादन केले. यावेळी सुभाष घाटे विदर्भ युवक अध्यक्ष, जगधीश वैद्य युवक शहर अध्यक्ष, मंगेश सातपुते, अनिल, अरुण टिकले, प्रकाश कांबळे नागपूर, मुकुंदा खेडेकर खामगाव, जेष्ठ समाज सेवक दादा जम्मन व्यवहारे, महीला जिल्हा अध्यक्ष सुषमा राउत, शंकरराव राउत, संतोष माळोदे तालुका अध्यक्ष, आदी समाज बांधव उपस्थित होते.