उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे आराद्य दैवत राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त आज सकाळी ११ वाजता प्रतिमेचे पुजन उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील, उस्मानाबाद नगरी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले याप्रसंगी महात्मा बशेवश्वर पतसंस्थेचे चेरअम श्रीकांत साखरे माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंखे,धनंजय शिंगाडे,चर्मकार युवा प्रदेश उपाध्यक्ष नितिन शेरखाने,नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, वंजारी समाजाचे पांडुरंग लाटे,लिंगायत समाजाचे शिवानंद कथले, सोनार समाजाचे मुकेश नायगावकर यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या समाज प्रबोधना बद्दलची माहीती उपस्थितींना दिली.खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी समाजाला संताजी जगनाडे महाराज यांची शिकवण प्रत्येक युवकांना व घरात पोहचवण्याच काम तेली समाजानं केलं पाहिजे असे म्हणाले. यानंतर जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने कोव्हीड सेंटरमध्ये काम करणारे सेविका यांचा साडी चोळी,सेवक व सफाई कर्मचारी यांचा शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी आरोग्य कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमास जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, सचिव अँड विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष दत्ता बेगमपुरे, दादासाहेब घोडके, जितेंद्र घोडके, शशिकांत बेगमपुरे, सचिन कुबेरकर, सचिन राऊत, वैजिनाथ गुळवे, पंकज पाटील, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade