मेहकर - येथील संताजी कॉन्व्हेंटमध्ये संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त संताजी महाराजांच्या मुर्तीचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला संताजी कॉन्व्हेंटचे उपाध्यक्ष अॅड.संतोष राजबिंडे, डॉ.दिगंबर व-हाडे, गजानन महाकाळ, संतोष चोपडे, अॅड. गोपाल पाखरे, संताजी कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा राजबिंडे, पुष्पाताई भगत, विजय देव्हडे, नंदकिशोर पाखरे यांची उपस्थिती होती. दरम्यान संताजी महाराजांची आरती म्हणून पुष्प अर्पण करण्यात आले व सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रामाला उपस्थित समाजबांधना संताजी
महाराजांच्या कार्याची माहिती डॉ.दिगंबर व-हाडे यांनी सांगितली. तुकाराम महाराजांची गाथा संताजी महाराजांच्या कठोर परिश्रमामुळे जिवंत राहू शकली, असेही ते म्हणाले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade