गडचांदूर (ता.प्र.) - गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोकराव बावणे यांनी भूषविले. बंडू भाऊ वैरागडे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. राजेश गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूर अध्यक्ष शंकरराव नागपुरे, कार्याध्यक्ष बांधकाम सभापती विक्रम येरणे, सचिव नत्थु जी शेंडे, तुषार कलोडे, नगरसेवक राहुल उमरे, अरविंद मेश्राम, कोवान कातकर, प्रा. मंगेश करंबे, राजुभाऊ मुळे, दिपक वरभे, विवेक येरणे, प्रा. अनिल मेहरकुरे, बंडू भाऊ रागीट, राजेश देवगडे, तुषार बावणे, नागेश बावणे, अनंत येरणे यांनी परिश्रम घेतले. प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade