श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती हिवरखेड येथे साजरी
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूळ गाथेचे लेखनकर्ते, जांच्या अथक परिश्रमातून तुकाराम महाराजांच्या गाथा आपल्यासमोर आल्या, तुकोबारायांचे सर्वात आवडते टाळकरी व शिष्य, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज. संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात राहून त्यांच्या असंख्य रचना संत संताजी यांनी तोडपाठ केल्या होत्या म्हणूनच इंद्रायणी मध्ये सर्व साहित्य बुडवल्यावरही त्यांना योग्य पद्धतीने लेखन करण्याचे कार्य संत संताजी जगनाडे महाराज यांनी केले. संताजी महाराजांचे आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे कार्य असून प्रत्येक तेली बांधवांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
८ डिसेंबर रोजी त्यांचा जन्म दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रूपराव येथे समाज बांधवांनी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली समाज बांधव व हिवरखेड येथील गावकरी व पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी यांनी उपस्थित राहून 394 वी जयंती कोरोना चे औचित्य राखून गावाबाहेर वान प्रकल्प कॉलनी येथे सुरक्षित अंतर राखून साजरी करण्यात आली. समाजातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती..