नाशिक - सिडको संत जगनाडे महाराजांच्या लेखनामुळेच जगद्गुरु संत तुकारामांची ग्रंथगाथा जगासमोर येऊन त्याचे महत्त्व कळाले. संत संताजी हे सर्व जाती-धर्माचे मार्गदर्शक असल्याचे मत बी. जी. चौधरी यांनी व्यक्त केले.
नवीन नाशिक तेली समाज संचलित श्री संत जगनाळे महाराज सेवा मंडळ, संताजी युवक मंडळ सर्वांगीनीं महिला मंडळ यांच्यातर्फे संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी चौधरी बोलत होते. प्रमुख पाहुणे विठ्ठलराव शेलार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. उपाध्यक्ष विनायक सोनवणे यांनी जगनाडे महाराजांचा जीवनपट सांगितले. मंचावर संताजी मंडळ नाशिक जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गवळी, नवीन नाशिक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चौधरी, युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश चौधरी, रमेश चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी मंडळाचे सचिव वसंत चौधरी, खजिनदार नामदेव चौधरी, अर्जुन वेताळ, किशोर चौधरी, विनोद गणोरे, नितीन पवार, महिला मंडळाच्या सरिता सोनवणे, सुनिता बोरसे, ललिता रत्नपारखी आदीसह समाज बांधव उपस्थित होते. राजेंद्र गवळी यांनी आभार मानले.