शिर्डी : अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिडी शहर तेली समाजाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात येणार असून, याचा शुभारंभ साईनगरीच्या प्रांत कार्यालयापासून करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने दि.८ डिसेंबरला जयंती साजरी करण्याचे अध्यादेश जाहीर केले. याचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय कार्यालयात तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये संताजी महाराज यांची प्रतिमा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिर्डी येथून सुरुवात करण्यात आली. शिर्डीत प्रांत कार्यालय, नगरपंचायत, तलाठी कार्यालय, साईनाथ माध्यमिक विद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक मराठी शाव्य अशा विविध ठिकाणी शिडौं शहर तेली समाजाच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा भेट देण्यात आली..
यावेळी शिर्डी शहरातील ज्येष्ठ तेली समाजबांधव दत्तात्रय लुटे, यशवंतराव वाघीरे, अँड. विक्रांत वाघचौरे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बद्रीनाथ लोखंडे, शिडी शहराध्यक्ष रबोंद्र महाले, धीरज ब्यवहारे, विजय जजाळ, अंजली कोते, अशोक गाडेकर, राजेंद्र पासवान व मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.