गंगाखेड - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला.आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रतिपादन राम दावबाजे यांनी केले.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गंगाखेड शहरात तेली समाजाच्या वतीने पुण्यतिथी निमित्त दावलबाजे यांचा निवासस्थानी सोशल कोरोनाचा पार्श्वभूमीवर डिस्टनशिंग ठेवत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.श्री संत जगनाडे महाराज यांचा प्रतिमेस राम दावलबाजे यांनी पुष्पहार अर्पण करण्यात यावेळी संजय गौरकर,मारोती लासे, प्रल्हाद गौरकर,सुनील गौरकर, प्रभु अप्पा दावलबाजे, अन्नसापुरे,फुटके एम.बी.भिसे, अशोक फुलारी राजू गौरकर, शिवशंकर चन्ने,दावलबाजे,सह समाज बाधव उपस्थित होते.