परभणी - आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती मंगळवार ८ डिसेंबर रोजी नांदखेडा रोडवरील पलसिध्द सेवाआश्रम येथे साजरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या परभणी जिल्हा शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत संत श्री संताजी जगनाडे महाराज याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, शिवलिंग खापरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात शंकर फुटके, सुधीर सोनुनकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. या प्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांनी केलेल्या समाज प्रबोधना बद्दलची माहिती मान्यवरांनी आपल्या मनोगनातुन व्यक्त केली. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भास्करराव देवडे, सचिव निळकंठ राऊत, मन्मथ देशमाने, किरण क्षीरसागर, महीला जिल्हाध्यक्षा आशाताई नखाते, ज्ञानेश्वर सरकाळे, आकाश भिसे, शंकर फुटके, सुधिर सोनुनकर, पोवेकर स्वामी, संतोष माने, कल्याण नखाते, नागनाथ डोगरे, दिपक स्वामी, मधुकर डोंगरे, चंद्रशेखर राऊत, गणेश वाघमारे, गोविंद साखरे, सखाराम डोंगरे, फूलमोगरे आदी उपस्थित होते. सूत्र संचलन गोपाळ नगरसाळे यांनी आभार दिपक शिंदे यांनी मानले.