सुदुंबरे - श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा २०२१ चे नियोजनाची सभा श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी झाली. कोरोनामुळे यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सोहळा मुख्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे, यावर्षी ११ जानेवारी आणि १२ जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम समाज मेळावा, शिक्षण समिती कार्यक्रम, दुसऱ्या दिवशीची वार्षिक सर्वसाधारण आणि महाप्रसाद असे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
उद्घाटक याच्या हस्त श्रा सत संताजी महाराज समाधी अभिषेक आणि महापूजा करण्यात येईल.तसेच परंपरेप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज यांचे फुलांचे कीर्तन मोजक्याच वारकरी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीत होऊन अत्यंत सध्या पद्धतीने यावर्षीचा पुण्यतिथी उत्सव सोहळा होईल. याची महाराष्ट्रातील सर्व समाज बंधू आणि भगिनींनी नोंद घ्यावी.
याप्रसंगी पुण्यतिथी उत्सव अध्यक्ष जयंत राऊत आणि पुण्यतिथी उत्सव उद्घाटक सिद्धेश रत्नपारखी यांचा संस्थानच्या वतीने शिवदास उबाळे, अध्यक्ष सुदुंबरे संस्थान आणि ह. भ. प. अरुण काळे, अध्यक्ष पालखी सोहळा यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव पिंगळे, उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे, कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, मुख्य चिटणीस अॅड. राजेश येवले, खजिनदार दत्तात्रय शेलार, चिटणीस प्रशांत भागवत, चिटणीस शैलेश मखामले, महिला चिटणीस विमलताई वाव्हळ, सरपंच, वाघोली वसंधरा ताई उबाळे तसेच उपाध्यक्ष पालखी सोहळा गंगाधर हाडके, पालखी सोहळा विश्वस्त ह.भ.प. बाळासाहेब काळे, ह.भ.प. विश्वास डोंगरे, ह.भ. प. कोंडीबा दिवेकर, तसेच नाना चिलेकर, प्रदीप उबाळे, संतोष काळे, चंद्रकांत जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कोकण महाराष्ट्र तैलीक महासभेचे अध्यक्ष सतीश वैरागी यांनी सर्व समाजबंधूंना वरील सूचनेबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.