भोसरी :- महाराष्ट्र तैलिक महसभेची सहविचार सभा येथे संपन्न झाली यावेळी महासभेचे महासचिव श्री. भुषण कर्डीले, कार्याध्यक्ष, श्री. गजानन शेलार उपास्थीत होते. बरेच महिने रिक्त असलेल्या पुणे विभाग पदासाठी उपस्थीत आसलेल्या सर्व समाज बांधवाना विचारणा केल्या नंतर बहुमताने श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ यांची अध्यक्ष पदी निवड केली. डोंगर दर्यात विखुरलेल्या समाज बांधवांना एकत्रीत करून त्यांनी महाराष्ट्रात कुणाला जमले नाही अशी परिचय पुस्तीक वधुवर मेळावे व इतर समाज उपयोगी काम केल्या मुळे त्यांची या पदावर निवड झाली. त्यांच्याशी सपर्क साधला आसता ते म्हणाले या विभागातील काही परीसरात खाने सुमारी झाली आहे. काही परिसरात राहिलेली आहे. ती पुर्ण पहिली करून घेतो. त्या नंतर पुणे या मध्यवर्ती ठिकाणी समाज एैक्याचा मेळावा घेतला जाईल. विभगातील सर्व विचार प्रवाहांना मी भेटणार आहे. त्यांचे विचार समजुन घेऊन समन्व्य साधुनच हा मेळावा घेईल. मतभेद या पेक्षा समाज संघटन महत्वाचे आहे. या वेळी कार्याध्यक्ष पदी श्री. गंगाधर हाडके यांची निवड झाली . ते या पुर्वी पुणे तिळवण तेली समाज सुदुंबरे संस्था सचिव होते. त्यांच्या कामाचा अनुभव इथे संघटने साठी उपयोगी येईल.
श्री. चंद्रकांत शेठ व्हावळ यांच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी उत्सुक बांधवांची यादी तयार केली समन्वय साधुन पाहिला शेवटी चिठ्या टाकुन श्री. महादव फल्ले सर यंची निवड जाहीर केली श्री. ज्ञानेश्वर दुर्गडे यांची पुणे उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी तर श्री. प्रकाशा गिधे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली गेली. कार्य भार स्विकारून श्री. फल्ले सर यांनी संघटन बांधणी साठी संपर्क सुरू केला आहे. सहविचार सभेला पुणे शहर, पुणे दक्षिण पुणे उत्तर व पिंपरी चिंचवड मधील बांधव उपस्थीत होते. सहविचार सभेची व्यवस्था श्री. विष्णूपंत ढेंगाळ व श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे यांनी केले.