सुतारवाडी : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. दरवर्षी अत्यंत उत्साही वातावरणात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणात समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आकर्षक अशा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी त्याच प्रमाणे सदस्य उपस्थित होते. प्रतिवर्षा प्रमाणे स्मरणिकेचे प्रकाशन झाल्या नंतर समाज बांधवांच्या घरोघरी जावून दिनदर्शिका दिली गेली. या उपक्रमाचे स्वागत समाज बांधवांच्या घरी उत्साही वातावरणात केले जाते. या वर्षीही ती परंपरा समाज बांधवांनी अखंड पणे चालू ठेवली. या वर्षीही मार्गदर्शक विनायक तार्लेकर यांच्या समवेत रत्नाकर महाडिक, शांताराम दळवी, राजन रहाटे, देवेंद्र राऊत आणि सौ. रोहिणीताई महाडिक आदींनी समाज बांधवांच्या घरोघरी जावन नववर्षाची दिनदर्शिका दिली.