तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाव्दारे विदर्भस्तरीय तेली समाजाचा ३३ वा उपवधू-वर परिचय पुस्तीका "शुभ मंगलम् प्रकाशन सोहळा" संताजी मंदिर संकटमोचन रोड, यवतमाळ येथे रविवार दि. १४/२/२०२१ रोजी सकाळी ९ वा आयोजित केला आहे. दरवर्षी मंडळ मोठ्या स्तरावर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत असते परंतु यंदा कोवीड-१९ या जागतीक महामारीमुळे मेळाव्याचे आयोजन करणे शक्य झाले नाही. परंतु समाजाची गरज लक्षात घेता मोठ्या धाडसाने मंडळाने "शुभमंगलम्" उपवधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. मंडळाच्या अथक प्रयत्नानी ४२४ उपवधू-वर मुला-मुलींनी या मध्ये नोंदणी केली असून पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश रामभाऊजी ढोले, अध्यक्ष तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ हे राहणार असून प्रमुख अतिथी शैलेश गुल्हाने, अध्यक्ष श्री. सं.शि.प्र.म. यवतमाळ व मनोहरराव गुल्हाने, जेष्ठ संचालक तेली समाज विवाह मंडळ, यवतमाळ हे राहणार आहे. साध्या पध्दतीने हा प्रकाशन सोहळा आयोजित केला असून या प्रसंगी मंडळाच्या हितचिंतकांचा सत्कार होणार आहे. प्रकाशन सोहळा नंतर परिचय पुस्तिका वितरीत केली जाईल याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा.
कार्यक्रमाच्या आयोजना करिता सर्वश्री रामकृष्ण पजगाडे- उपाध्यक्ष, देविदास देऊळकरसचिव, सुरेश अजमिरे- उपाध्यक्ष, अशोक जयसिंगपुरे- उपाध्यक्ष, दामोधर मोगरकर - सहसचिव जितेंद्र हिंगासपुरे, शिवदास गुल्हाने, दिवाकर किन्हीकर, प्रकाश मुडे, मुकुंद पोलादे, विठ्ठल शिंदे, राजेश चिंचोरे, उत्तमराव गुल्हाने, रामकृष्ण शिरभाते, रमेश जिरापुरे, रामभाऊ ढाले, सुरेश जयसिंगपुरे, पुरुषोत्तम गुल्हाने, किशोर गुल्हाने, विद्याताई पोलादे, बाळासोब शिंदे, रश्मीताई गुल्हाने हे परिश्रम घेत आहेत.