यवतमाळ दि. १९ विदर्भ स्तरीय तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ यवतमाळ द्वारे आयोजित शुभमंगलम उप-वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ रोजी संताजी मंदिर, संकट मोचन रोड, यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केवळ परिचय पुस्तिकेच्या आधारे निर्णय घेवू नये, त्याची योग्य ती शहानिया करुनच निर्णय घ्यावा. त्यामध्ये शिक्षणाचे कागदपत्रे, स्थावर तथा जंगम मालमत्तेचे कागदपते इत्यादी पाहूनच खात्री करुन घ्यावी. तसेच समाजामध्ये घटस्पोटाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली व यावर समाजाने मंथन केले पाहिजे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश ढोले, अध्यक्ष तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळ, यवतमाळ यांनी सांगितले.
तसेच प्रमुख पाहुणे शैलेश गुल्हाणे म्हणाले की, विवाह मंडळाचे कार्य संपुर्ण विदर्भातच अग्रेसित असुन मंडळाचे भरभरुन कौतुक सुध्दा केले. प्रमुख पाहुणे मनोहरराव गुल्हाणे, माजी अध्यक्ष तेली समाज विवाह मंडळ, रामकृष्णा पजगाडे उपाध्यक्ष तेली समाज मंडळ, यतवमाळ उपस्थित होते. कार्यक्र माची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते व संताजी महाराजांचे पुजन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामोधर मोगरकर यांनी मागील ३२ वर्षाचा मंडळाचा अहवाल सादर करतांना सांगितले की, मंडळाचे सर्व पदाधिकारी व संचालकांनी अतिशय परिश्रम घेवून ४२४ परिचय पत्रक जमा करुन उपवर मुला मुलींची शुभमंगल पुस्तिका तयार केली. ज्यामध्ये २२४ उपवर व २०० उपवधु यांनी नोंद केली आहे. त्यानंतर सर्वश्री रत्नाकर पजगाडे, दामोधर मोगरकर, देविदास देऊळकर, सुरेश अजमिरे, नंदकिशोर जिरापुरे, सुरेश अजमिरे, अशोक जयसिंगपुरे, प्रकाश मुडे, जितेंद्र हिंसासपुरे, रमेश जिरापूरे, शिवदास गुल्हाने, विठ्ठलराव शिंदे, मुकुंद पोलादे, राजेश चिंचोरे, उत्तमराव गुल्हाणे, रामकृष्ण शिरभाते, दिवाकर किन्हींकर, सुरेश जयसिंगपुरे, बाळासाहेब शिंदे, राम ढोले, सौ. विद्याताई पोलादे, सौ. रश्मिताई गुल्हाणे इत्यादींचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर शुभमंगलम् उप-वधुवर मुलांमुलींचे पुस्तिकेचे व संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन देविदास देऊळकर व आभार प्रदर्शन सुरेश अजमिरे यांनी केले.