माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर करणार बैठकीला संबोधित
नगर- महाराष्ट्र राज्य प्रतीक तेली समाज महासभेची राज्यस्तरीय बैठक यावर्षी शिर्डी येथे होणार आहे. अखिल भारतीय तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर हे या बैठकीला संबोधित करणार असल्याची माहिती नाशिक विभाग प्रांतिक तेली समाज महासभेचे महासभेचे उपाध्यक्ष विजय काळे यांनी दिली.
यावेळी माजी आमदार शिरिश चौधरी, विज्याभाऊ चौधरी, विक्रांत चांदवडकर आदी उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता राहता शिर्डी रोडवरील सिद्धी संकल्प लॉन्स येथे पार पडणार आहे.
बैठकीनंतर लगेचच समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. यात राज्य कार्यकारिणीचे जी. एम. जाधव, सुखदेव वंजारी, शामकांत इशी, डॉ. अरुण भस्मे यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती महासभेचे नगर जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे यांनी दिली.
या मेळाव्यासाठी आणि बैठकीसाठी मुंबई, कल्याण, ठाणे, नागपूर, वर्धा, पालघर, जालना, गडचिरोली, चंद्रपूर, धुळे, औरंगाबाद, भुसावळ, नाशिक, परभणी, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, कराड, वाशीम, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, ठाणे, सांगली, यवतमाळ, बीड, अकोला, चाळीसगाव, नांदेड, नंदुरबार आदी जिल्ह्यातील तेली समाज बांधव व प्रांतीक तेली समाज महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्व समाज बांधवांच्या राहणे व जेवणाची व्यवस्था शिर्डी येथे करण्यात आली आहे.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. शिर्डी येथील मेळावा नियोजन समिती सदस्य अॅड. विक्रांत वाघचौरे, युवा जिल्हा अध्यक्ष सोमनाथ देवकर, उत्तर जिल्हा युवा अध्यक्ष राजेश लुटे, अरविंद दारूणकर, दत्ता सोनवणे, संजय पन्हाळे, अनिल जाधव, विजय बनसोडे, सोमनाथ बनसोडे, नितीन फल्ले, कैलास शेलार, डॉ. धनराज लटे.संतोष शेलार, सौ. शारदाताई करें, राजेश लुटे, सौ. देशाली लुटे, सौ. प्रमिलाताई घोडके, सौ. वैशाला लुट. कैलास बनसोडे, आसाराम शेजूळ, दिलीप दारूनकर, प्रमोद मांडकर, देविदास कहाणे, राजेंद्र म्हस्के, विठ्ठल अप्पा लुटे, शिरीष जावळे,संतोष क्षीरसागर, दिनकरराव घोडके, विक्रम काळे, वसंतराव क्षीरसागर, देविदास साळुके, पुरुषोत्तम सर्जे, अमित महाले, बंडू जाधव, विजय लोखंडे, सुरेश शेकुळ, संदीप सोनवणे, बाळासाहेब रोकडे, सचिन लोखंडे, प्रसाद महाले, संदीप मोरे, अमित महाले, सुरेश नागले, पांडुरंग बनसोडे, सागर राऊत, संतोष शेलार, संजय करपे, सुरेश गुंड, विलास दुर्गुड, कसबे सर, आदिनाथ मोरे, राहुल साळंके, दत्तात्रय शेलार, नितीन वालझडे, कमलाकर कसबे, संतोष बनसोडे, किरण करपे, अशोक शिंदे तसेच अहमदनगर जिल्हा प्रांतीक तेली समाज महासभा चे सर्व कोरकमिटी सदस्य, पदाधिकारी, महिला द युवा सदस्य मेळाव्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.