पाटण, दि. १३ : दरवर्षीप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साई मंदिर, पाटण येथे भक्तिमय व भाविकांनी साध्या पद्धतीने व कोरोना संसर्गाचे असणारे नियम व अटींचे पालन करत पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.
आज संपूर्ण जग हे कोरोना या महामारीने ग्रासले असताना व या महाभयंकर आजाराने सर्वच ठिकाणी हाहाकार माजवला आहे. यानुसार यावर उपाय म्हणून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. वाहतूकीचे साधन, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे, आस्थापनामध्ये गर्दी होणार नाही, खबरदारी घेण्याची सक्त ताकद दिली असल्याने शासन या गोष्टी शासन वारंवार बजावून सांगत आहे. दरम्यान, यानुसार सदर पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या यात्रा, विवाह समारंभ, पुण्यतिथी सोहळे यावर पुण्यतिथी सोहळा मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
सदरचा पुण्यतिथी सोहळा करण्याअगोदर जे कोविड योद्धा आपली सेवा बजावत असताना शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जे कोविड योद्धे सध्या कार्यरत आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभावे. परमपूज्य संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पाटण येथील तेली समाजाच्या बांधवांनी भक्तिमय वातावरणात साजरा केला.