नंदुरबार, ता. १७ : अखिल भारतीय तेली समाजाची बैठक भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा तेली युवक आघाडीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी झाली. तेली महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते.
हिरालालकाका चौधरी, राष्ट्रीय महासचिव डॉ. अरुण भस्मे प्रमुख पाहुणे होते. समाजात साखरपुडा पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करणे, मुंबई येथे तेली समाजाचे मंगल कार्यालय उभारणे, शासनदरबारी तेली समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आवाज उठविणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्राथमिक बैठकीनंतर शिर्डी येथे लवकरच राज्यव्यापी व्यापक बैठक होणार असून, यात राज्यातील तेली समाजाचे अध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी, महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत अशोक पांगारकर, मनोहर शिंगारे, साखराम मिसाळ, महेश चौधरी, के. डी. चौधरी, श्याम ईशी, विजय सपकाळ, अशोक सपकाळ, प्रिया मेहंदळे, प्रतिभा चौधरी, निरंजन करनकाळ, विक्रांत चांदवडकर, जी. एम. जाधव, माजी आमदार शिरीष चौधरी, अशोक चौधरी, संदीप चौधरी, अशोक व्यवहारे, कृष्णराव हिंगणकार, डॉ. राजेंद्र मचाले, राजेंद्र पवार, अॅड. खोब्रागडे भंडारा, साई शेलार, योगेश चौधरी, नंदुरबार तेली युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण चौधरी, शहराध्यक्ष सुभाष चौधरी, रूपेश चौधरी उपस्थित होते.