अखिल भारतीय तेली महासभा युवक आघाडीच्या झालेल्या राज्यव्यापी बैठकीत येथील शामकांत जगन्नाथ ईशी यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. शिर्डी येथे तेली महासभा युवक आघाडीची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर होते. शामकांत ईशी यांची एकमताने प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नियुक्तपत्र देत सत्कार करण्यात आला.
यावेळी नागपूरचे आ.अभिजित वंजारी, माजी खा.सुरेश वाघमारे, आ.शिरीष चौधरी, माजी शिवाजीराव मोघे, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.संध्या सव्वालाखे, डॉ.अरुण भस्मे, तेली महासभेचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, कार्याध्यक्ष विक्रांत चांदवडकर यांच्यासह राज्यातील तेली समाजाचे जि.प.सदस्य, नगरसेवक, पं.स.सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शामकांत ईशी यांनी यापूर्वी तेली युवक आघाडीच्या विभागीय अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, ओबीसी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी तर शिक्षण मंडळ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी विविध पदांवर केलेल्या कामांचा अनुभव पाहता त्यांच्या तेली समाजाची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शामकांत इंशी यांच्या निवडीबद्दल आ.अमरीशभाई पटेल, आ.काशीराम पावरा, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जि.प.सदस्य डॉ.तुषारभाऊ रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांच्यासह समाजातील नागरीकांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade