अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले. मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले. यावेळी शिक्षकांना संघटित करण्याची जबाबदारी ही संजय एकनाथ तायवाडे यांना देण्यात आली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश बाभुळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पुरस्कार सन्मानीत अशोक मांगलेकर व छत्रपती पुरस्कार प्राप्त मंगेश व्यवहारे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सहसचिव नितीन बाखडे,संचालक प्रा.स्वप्निल खेडकर, अशोक देशकर उपस्थित होते. तसेच शिक्षक बांधव म्हणून संजय तायवाडे, गजानन पाचपोर, प्रविण बाखडे, मंगेश व्यवहारे, निलीमा राजुरकर, शोभा बाभुळकर,आशा तायवाडे, संदीप राजुरकर, सोनाली जंगले सभेला उपस्थित होते. शिक्षक आघाडी व संपर्क नोंदणी अभियानास सुरूवात करण्यात आली असून, इच्छुकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन संजय तायवाडे, प्रा. स्वप्निल खेडकर यांनी केले आहे.