मालेगांव :- श्री. संताजी सेना सागर आहे आणि इतर संघटना छोट्या छोट्या नद्या आहेत. तरही श्री. संताजी सेनेला जाणीव आहे की. छोट्या छोट्या नद्या जोपर्यंत सागराला मिळत नाहीत तोपर्यंत सागराला ही सागर म्हणता येत नाही. म्हणुन तेली समाजातील सर्व संघटनांना माझे जाहीर आवाहन आहे की त्यांनी संताजी सेनेत विलीन होऊन संताजी सेनेच्या प्रवाहात सामील व्हावे. सागर रूपी संताजी सेना त्यांना आपल्यात सामील करून घेईल. असे आवाहन संताजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सचिनदादा भागवत यांनी येथे केले.
येथील कृष्णा लॉन्स येथे आयोजित संताजी सेना राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व बेरोजगारांना ऑटो रिक्षा वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. श्री संत संताजी महाराज यांची आरती होऊन प्रदेशाध्यक्ष प्रा. किशोर दादा चौधरी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राज्य उपाध्यक्ष श्री. रामदास धोत्रे साहेब यांनी दिपप्रज्वलन करून दहा सुशिक्षित बेरोजगारांना ऑटो रिक्षा देण्यात आल्या. नाशिक जिल्हा अध्यक्ष ऍड. शशिकांत व्वहारे यांनी प्रास्ताविक केले. संताजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. किशोर चौधरी यांनी उद्घाटन पर भाषणांत आपले मत सांडताना स्पष्ट केले की श्री. संताजी सेना आता संपुर्ण महाराष्ट्रभर व्यापली असुन त्याचे सर्व श्रेय नियुक्त जिल्हाध्यक्षांचे आहे. त्यांनी संताजी सेनेचा आपल्या कार्यातुन प्रसार व प्रचार केला. यापुढे क्रियाशीील जिल्हाध्यक्षांना त्यांच्या कार्याचा विशेष मान देण्यात येईल असे नमुद करून म्हणााले की, भविष्यात अनेक समाज प्रबोधनपर व सक्रिय उपक्रम संताजी सेनेमार्फत राबविण्यात येतील.
याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष रामदास धोत्रे, सातारा महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुरेखाताई हाडके, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज, अकोला जिल्हा शांताराम काळे, तसेच हिंगोली वाशिम, सांगली, सोलापूर, अमरावती, नागपूर, जळगांव, धुळे, परभणी, जालना, चंद्रपुर, औरंगाबाद, गोंदिया आदि जिल्हाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व जिल्हाध्यक्षांचा सत्कार मा. सचिनदादा भागवत व प्रा. किशोर चौधरी यांनी केला. तसेच श्रीसंत जगनाडे महाराज संस्था सुदुंबरे पुणे येथील संताजी महाराज यांचे १७ वे वंशज जनार्दनशेठ गोपाळशेठ जगनाडे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमात लाभली.
यावेळी पुणे येथील तेली गल्ली मासिक व चाळीसगांव येथील साप्ताहिक जनमत यांचे प्रकाशन मा. सचिनदादा भागवत यांच्या हासते करण्यांत येवुन संपादक श्री. मोहन देशमाने यांची संताजी सेना महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यांत आली. सोबत औरंगाबाद जिल्हा महिला अध्यक्ष सौ. दामिनी महाले, सातारा जिल्हा सौ. सुरेखा हाडके मॅडम नाशिक शहराध्यक्ष रमेश भागवत, नांदगांव तालुकाध्यक्ष बी. आर. चौधरी यांच्या नियुक्ता करण्यांत आल्या.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनबद्दल मालेगांव शहराध्यक्ष आबासाहेब चौधरी यांचे सत्कार सचिनदादा भागवत यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती बागुल, रमेश चौधरी, शरद चौधरी, किरण चौधरी, जगदिश चौधरी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.के. चौधरी व आभार प्रदर्शन त्र्यंबकनाना चौधरी यांनी केले. यावेळी संताजी सेनेचे शेकडो कार्यकर्ते व संपुर्ण महाराष्ट्रातुन आलेले पदाधिकारी उपस्थित होते.