काही बारकावे काही परंपरा काही रितीरिवाज व इतिहासाच्या पानाच्या कोपर्यात दडलेला इतिहास आज पाऊले फुटून बाहेर येत आहे. याची साक्ष महाराष्ट्राच कुलदैवत भवानी मातेच्या पालखी पलंग बाबत येते.
शक राजे पैठण मध्ये राज्य करीत होते. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली. आजच्या नगर शहरा जवळ घनदाट जंगल होते. या परिसराला अंधेरी नगरी म्हणत. वेरूळ येथील राजा तेलंग व पैठणचे शक राजे यांचा सबंध होता. अंधेरी नगरी ही तेलंग राजाची होती. त्यांच्याकडे मुर्ती व देवीचे सिंहासन होते. कर्नाकटकावर स्वारी करताना त्यांनी देवीची मुर्ती व सिंहासन बरोबर घेऊन गेले होते. तुंबळ लढाईत तेलंग राजा शहिद झाला. मुर्ती व सिंहासन तेथेच राहिले. त्या परिसराला पुर्वी चिंचपुर हे नाव होते. त्या क्षेत्राला तुळजापुर म्हणु लागले. तुळजाभवानी मंदिरा जवळ आज ही त्या तेलंग राजाची समाधी आहे. या बद्दल जुनी जाणती लोक काही कथा सांगतात.