महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस महासचिव डॉ.भूषणजी कर्डिले यांच्या आदेशानुसार महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता zoom app वर महिला दिनाचं औचित्य साधून महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात करताना रायगड विभागीय महिला अध्यक्षा प्रियाताई डिंगोरकर यांना सर्वानूमते कार्यक्रमाचे अध्यक्षा बनविण्यात आले. नाशिक विभागीय महिला अध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांची महिन्यातून एकदा अशी आँनलाईन सभा व्हावी असे मत मांडले. तसेच नागपूर विभागीय महिला अध्यक्षा सौ. नयना झाडे यांनी ऑनलाईन सभा आयोजित केल्याबद्दल सौ. रोहिणी महाडिक व सौ. प्रियाताई डिंगोरकर यांचे आभार मानले व महिलांनी एकत्र येवून शासनामार्फत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले. ठाणे विभाग महिला अध्यक्षा सौ. पुष्पाताई बोरसे यांनी सर्वाना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या डॉ. सौ. स्वाती प्रवीण घोडमारे यांनी महिलांसाठी उल्लेखनीय काम केले आहे. तसेच त्यांनी गरोदर माता, स्तनदा माता, पाच वर्षावरील बालके व कुपोषित बालकांच्या आरोग्याविषयी काम केले आहे. सद्या महाराष्ट्रातील शासकिय रूग्णालयातील पूर्नवसन केंद्राची नोडल आँफिसर काम पहात आहेत. महिलांना अतिशय बहूमल्य मार्गदर्शन केले. प्रसिध्द लेखिका सौ विमालताई वाव्हळ यांनी महिलांना अमूल्य मार्गदर्शन केले. कोकण विभागीय अध्यक्ष श्री. सतिशजी वैरागी यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांचे जास्तीत जास्त संघटन व्हायला हवे. महिलांचे सक्षमीकरण व्हायला हवे,तसेच मुंबई विभगीय महिला अध्यक्षा सौ रोहिणी ताई महाडिक या वार्षिक सहल आयोजित करतात तसे आयोजन प्रत्येकाने करावे. महिलांनी सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान द्यावे असे मत व्यक्त केले. मुंबई महिला अध्यक्षा सौ. रोहीणीताई महाडिक यांनी उत्कृष्ट सुत्रसंचालन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा शेवटी अध्यक्षा प्रियाताई भावेश डिंगोरकर यांनी महिलांनी राज्यस्तरीय संघटित होऊन समाजासाठी कार्य करावे असे आव्हान केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून सर्वांचे आभार मानले. म.प्रा.तै.म.ग्रामीण नागपूर जिल्हाध्यक्षा सौ मंजुताई कोरमारे यांच्या सुंदर कवितेने सभेची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी ५० महिलांनी उपस्थिती लावली होती. तसेच सौ. कांचन तेली, सौ. मनिषा चौधरी, सौ. श्रद्धास्थान खेडस्कर, सौ. साक्षी उबाळे, सौ. शितल सावडवकर, सौ. नेहा रहाटे, सौ. निकीता लांजेकर, सौ शुभांगी ताई खळदे. सौ प्रद्न्या धोत्रे, सौ. प्रियांका रहाटे, सौ. सोनल पिंगळे, सौ. मिरा पिंगळे, सौ. वर्षा खाडे, सौ. सुनीता किर्वे, सौ. संज्योत चालेकर, सौ. अस्मिता चौधरी, सौ. अनिता पवार, सौ. जयश्री गभाने, सौ. जयश्री शेलार सौ.मंजू कारेमोरे, सौ. शितल देशमुख सौ. तारा महिन्द्रे आदींनी आँनलाईन उपस्थिती लावली.