संताजी ब्रिगेट तेली समाज महासभा चा वतीने मुख्य जिल्हाध्यक्ष सौ.कविता ताई ठाकरे यांच्या भंडारा जिल्हा निवास्थानी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवकांनच्या उपस्थितीत, ध्यान ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनाच्या स्मृती चा जागर करून आजच्या जीवनात त्यांच्याकडून काय प्रेरणा घेऊ शकतो या विचारावर प्रबोधन करतांना. सौ. कविता ताई ठाकरे यांनी सांगितले अनंत अडचणीला मात देऊन, आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका व समस्त स्त्रियांना, उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीच्या पुण्य पर्वावर माझ समाजाला एकच सांगणे आहे ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले समाजाच्या बेताल कुप्रथा चा सामना करून आपल्या संपूर्ण स्त्रीजातीला उजेडाची वाट दाखवण्याचे धाडस त्यावेळी केले यापासून प्रेरणा घेऊन आजच्या काळामध्ये स्त्रीवर होणारे अन्याय अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा समाजातील आपण सर्व जन एकत्रित येऊन या अत्याचाराचा सामना करण्याकरिता आपल्या सर्वांची शक्ती एकत्रित करण्याची गरज आहे.आजही कित्येक स्त्रिया अत्याचार पीडित राहून आपले संपूर्ण आयुष्य दुर्भाग्यपूर्ण जगण्यास मजबूर आहे. चला या एकत्र एकमेका हात धरून अवघे होऊ सुपंथ असा जमलेल्या सर्व समाज बांधवांचा समोर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम ला उपस्थिति मानवाधिकार आरटीआई अध्यक्ष चन्द्रशेखर कोहड़ जी भंडारा आणि सभासद निखिल श्रवनकर , अंशुल कामदे, हेमलता जिभकटे,उषा वालदेकर , वर्षा बांते, देविका पंचभाई , कांचन खदसिंगे,वैशाली वाघमारे,मंदा शेंडे,इत्यादि उपस्थिति कार्यक्रम ला होती.