धुळे- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले , कोषाध्यक्ष गजाननजी शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी, सुनिल चौधरी , कल्याण, प्रसिध्दी प्रमुख दिलीप चौधरी, यांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर, महासचिव नरेंद्र चौधरी, महासचिव संकेत बावनकुळे, उपाध्यक्ष विपीन पिसे, उपाध्यक्ष जगदीश वैद्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तेली समाज व जनतेला जाहिर आवाहन करण्यात येते की, राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे रक्तदान श्रेष्ठदान या सामाजिक जाणिवेतून आपल्या शहरातील जवळच्या रक्तपेढीत जावून रक्तदान करावे. रक्तदातास संघटनेच्या वतीने
ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. रुग्णांना वरदान ठरणारे प्लाझ्माची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र प्लाइमा दान बाबत नागरिकां मध्ये प्रचंड गैर समज आहेत. प्लाझ्मा दान प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुरक्षित आहे. प्लाझ्मा दान कोणताही व्यक्ती करू शकतो मात्र कोरोना बाधित रुग्ण साठी जर प्लाइमा द्यावयाचा असेल तर त्या करिता दान करणारा व्यक्ती कोरोना मुक्त झालेला असावा.कोरोना मुक्ती नंतर सदर व्यक्ती २० दिवसा नंतर आणि ९० ते १०० दिवसा प्रयत्न प्लाझ्मा दान करू किंवा ज्यांना माहिती नाही की कोरोना लागण झाली किंवा नाही तर अश्या व्यक्तीही अँटिबॉडी टेस्ट करून प्लाइमा दान करू शकतो . प्लझमा दान करण्यासाठी किमान वजन ५० किलो हवे तसेच ५५ वर्ष आतील व्यक्ती दान करू शकतो.प्लाइमा दान केल्या नंतर अवघ्या १२ ते २४ तासात पुन्हा तेव्हढाच प्लाझ्मा आपल्या शरीरात तयार होतो . एक व्यक्ती प्लाइमा दान केल्या नंतर ८ किंवा १५ दिवसात पुन्हा प्लाइमा दान करू शकतो. प्लाझ्मा दान केल्या मुळे कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही. विशेष म्हणजे त्या नंतर अत्यन्त फ्रेश वाटत. प्लाइमा दान करण्यासाठी आपल्या ला फक्त ४५ मिनिटांचा संयम आवश्यक आहे. आपल्या या ४५ मिनिटाच्या संयमाने आपण २ कोरोना बाधित व्यक्तीचे जीवन वाचवू शकतो. एका व्यक्तीच्या शरीरातुन ४०० एमएल प्लाइमा काढण्यात येतो. सद्याच्या स्थितीत अत्यन्त बिकट आहे. आपण सर्वांनी या महान कार्यासाठी पुढे आले पाहिजे. असे आवाहन जिल्हा अध्यक्ष कैलास काळू चौधरी, वि. अध्यक्ष संजय चौधरी, वि.उपाध्यक्ष तुधार चौधरी, गिरीश चौधरी, शशिकांत चौधरी, हिरु आप्पा चौधरी, मुकेश चौधरी, कुगाल चौधरी, अमोल चौधरी, गोंविद भाऊ चौधरी, भुटु आप्पा चौधरी, विनोद चौधरी, किशोरभाऊ थोरात, किरण बागल, किशोर बोरसे, चंद्रकांत चौधरी संदीप चौधरी, योगेश चौधरी, सुनील चौधरी, सुरेश चौधरी, रमेश करनकाळ विलास चौधरी, रणवीर चौधरी, राजु भाऊ चौधरी, महेश बाविस्कर, वालकेश चौधरी, कल्पेश चौधरी, किसन थोरात, गणेश भाऊ चौधरी, गजानन चौधरी, योगेश चौधरी, सजन चौधरी, दिलीप सुर्यवंशी, पिंटू भाऊ चौधरी, जयवंत जिभाऊ चौधरी, पंकज चौधरी, नितीन चौधरी, उमेश चौधरी, कमलेश चौधरी, भैया चौधरी यांनी केले आहे.