३ एप्रिल अमरावती : प्रा.स्वप्निल खेडकर हे 10 वर्षापासून समाजामध्ये काम करत असतांना त्यांनी युवा वर्गासाठी केलेले वेगवेगळे सामाजिक उपक्रम प्रेरणादाही ठरत आहे. नेहमी समाजासाठी जनजागृती करत त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. कोरोना काळात नुकताच संताजी जगनाडे महाराज विषयी प्रश्नमंजुषा तयार करून घर घरात संताजी महाराजांची ओळख निर्माण व्हावी हा स्तुत्य उपक्रम घेतला. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेक संघटना मध्ये काम करत असतांना आपली एक ओळख निर्माण केली. कुठलाही भेदभाव न करता समाज एकत्र कसा येईल यासाठी विशेष प्रयत्न ते करत आहे. मराठा तेली समाजाचे संचालक असलेले प्रा. स्वप्निल खेडकर हे मूळ तिवसा येथील असून ते स्थानिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाव्दारा संचालित अभियांत्रिकी विभागामध्ये प्राध्यापक आहे.
आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजासाठी आपणही थोडा वेळ देऊन समाजकार्यात आपला हातभार लावावा अशी ठाम भूमिका असलेले प्रा. स्वप्निल खेडकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती तर्फे खासदार रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमीत्य झालेल्या कार्यक्रमात अमरावती शहर युवा महासचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी अमरावती व यवतमाळ विभागाचे पदाधिकारी संजय हिंगासपुरे, प्रा.डॉ. संजय तिरथकर, डॉ. संजय शिरभाते, राजु हजारे, अविभाऊ देऊळकर, विजय शिरभाते, अविनाश जसवंते, किरणताई गुलवाडे, विनोद मोदी, किशोर जिरापुरे, दिनेश फणसे, बाळासाहेब लोहारे, चंदु जावरे, सुनिल चौकडे प्रामुख्याने उपस्थित होते. युवा आघाडीतील विभागीय अध्यक्ष सागर शिरभाते, विदर्भ उपाध्यक्ष अमोल आगाशे, कार्याध्यक्ष कुशल बिजवे, उपाध्यक्ष वैभव बिजवे, शहर अध्यक्ष सचिन फणसे, सौ. सविता भागवत व रुपाली शहाडे, शुभम माथुरकर, पियुश हिंगासपुरे, अभिजीत खोरगडे, आकाश भातकुलकर, आकाश राजगुरे, शुभम अग्रवाल, बबलु अंबाडेकर, प्रमोद गुल्हाने, राजेन्द्र पिसे, लिना जावरे, सविता भागवत, रुपाली शहाडे, विशाखा बाखडे, सुवर्णा शिरभाते, दिपाली ढोले, जया जावरे, राजश्री गुल्हाने, नंदा पिंपलकर, महीमा श्रीराव, अनिता फणसे, पद्मा खेडकर, राजश्री लाहोरे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.