बुर्हानगरच्या बाळोजी भगतांच्या वंशजांनी बनवलेल्या पालखीतच देवीला स्थापन्न करतात. जानकोजी भगतांची समाधीजेथे आहे तेथे एक दिवस ठेवतात रात्री हाजारो गोंधळी, हजारो भक्त सहभागी होतात. शिंलागणास निघण्यापुर्वी पालखी मंदिराच्या होम कुंडा जवळ असते. देवीस दुधाची भोग केली जाते. देवीला पातळे नेसवली जातात नंतर जानकोजी भगत यांच वशंज स्वत:च्या कमरेस बांधुन आनलेला पेंडभाजीचा नैवद्य देवीला दाखवितात. त्याच ठिकाणी स्वत:च करंगळीच्या रक्ताचा टिळा देऊन देवी समोर बकर्याचे बलिदान करतात. भगत घराण्यातील स्त्रिया आरती म्हणातात आरती नंतर देवीला पालखीत ठेवतात. आरती झाल्यावर पालखी ठेवन तेली समाजाने आणालेल्या पलंगावर देवी पाच दिवस विश्रांती घेते पेंड भाजीचा नैवद्य दाखवुन पौर्णिमेस देवीला सिंहासनावर ठेऊन देतात. जानकोजी, बाळाजी भगत यापासुन ही सुरू झालेली ही परंपरा खानाचा सरदार जो आपसिंग या गवाचा जाहगिरदार होता. माझा खान बाळाजी भगता मुळे मेला हा त्याचा समज होता. बाळाजीने खोटी भवानी मता ठेवन खरी घेऊन गेला. शिवाजीची शक्ती त्यांने अबाधीत ठेवली ती जर ठेवली नसती तर मुर्ती भंग पावताच शिवाजीलाच खानाने मारले आसते. हा राग त्या जाहागीरदाराचा होता. त्याच्या गवावरून बाळाजी ला पालखी घेऊन जावे लागे परंतु त्याने रस्ते बदलुन पालखी तुळजापुरास नेहण्याचा उपक्रम तसाच चालू ठेवला. एक वेळ पालखी घेऊन जाताना त्यांचे निधन झाले. जानकोजींची समाधी आज ही तुळजाभवानी मंदिरा समोर आहे.
श्री. मोहन देशमाने