तुळजापुरची माहेरवाशीन राहुरी पालखी ( तेली समाज ) सोहळा अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी भवानी मातेची मुळ मुर्ती ही सुरक्षित स्थळी नगर जवळ बुर्हानगर येथे आनली गेली हा इतिहास झाला परंतु श्री. अर्जुनराव भगत यांना अनेक वयोवृद्ध लोकानी सांगीतले. देवगीरीचे राज्य धोक्यात आल्यावर तेथिल भवानी मातेची या ठिकाणी सुरक्षित ठेवली होती. पण जेंव्हा बुर्हाणशहा बादशाहा हाल्ले करू लागला तेव्हां येथिल तेली राजाने ती कर्नाटकाकडे सुरक्षित स्थळी घेऊन निघाला वाटेतच त्याचा तुळाजापुर येथे त्यांचे निधन झाले. तेथेच महाराष्ट्राचे कुलदैवत वसले गेले.
पुर्वी ही पालखी हिंगण गाव हुन जात असे पण ती राहुरी येथून जावू लागली. खास पालखी साठी बुर्हानगर येथिल देवीच्या भगता कडुनच पालखीचा दांडा येत असतो. ही तयार करण्याचा मान सुतारांचा आसतो. त्या साठी लागणारे खीळे लोहाराकडूनच येतात. जंगम पालखीला गोंडे लावतात हा मान त्या त्या घरातल्याना दिला जातो. तेली समाज हे सर्व करवुन घेतो. व समाज जागेत पालखी ठेवली जाते. पालखीची मिरवणुक सुरू होण्यापुर्वी शेटे घराण्याचा मान आसतो तर तांबोळी यांनी पान दिल्या नंतर पालखीची मिरवणूक एैतिहासिक परंपरेने सुर होते. आज गावचा परिसर वाढला असला तरी पालखी आज सर्व गावात मिरवली जाते आनेक जन तीचे दर्शन घेतात. समारंभ पुर्वक बुर्हानगरकडे रवाना होते. मिरवणूकीच्या वेळी राहुरी साखर कारखान्या तर्फे बँड पथक कारखान्याच्या खर्चाने दरवर्षी हाजेरी लावत आसते.
ही एैतिहासिक परंपरा आजही उत्साहात पाळली जाते. जुन्या समाज परंपरेत नवीन पिढी भरच टाकीत आहे.