पुणे :- श्री. संताजी सेनेच्या वतीने सध्याच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर धुलिवंदन व रंगपंचमी सण साजरा न करण्याचा संकल्प करून यावर होणार्या खर्चातून संताजी सेनेच्या पदाधिकार्यांनी अप्पर-सुपर इंदिरानगर येथील श्री संताजी सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे यांच्या मातोश्री कै. सौ. जयश्री बबन उबाळे यांच्या स्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री. संताजी सेना व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यामने आयोजित कलेल्या मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे ४०० गरजूंनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी १५० गरजूंनी नेत्र तपासणी करून घेतली. यातील ४ व्यक्तींची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी नाममात्र दरात चष्मे देण्यात आले.
या शिबिरात डॉ. पारस शहा, डॉ. संजय बुटाला. डॉ. प्रशांत लचके, डॉ. सुरेश धांडे, डॉ. श्री. व सौ. हेरलेकर यांनी सर्व तपासण्या केल्या पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. रमेश भोज यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष व्हावळ यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यास सर्व पदाधिकार्यांनी मान्यता देऊन या शिबीराचे आयोजन केले. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक दिनेश धावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अभय छाजेड, लायन्स क्लबचे अध्यक्ष इंद्रजितसिंग राणा, लायन्स प्रतिष्ठानचे अध्यक्ष, चंद्रहास शेट्टी , लायन्स क्लबचे सचिव राजेश तांदळ, श्री. संताजी सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रामदास धोत्रे, नगरसेवक बाळा ओसवाल, राष्ट्रवादी कॉंग्रेस मजदूर संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष नाना क्षिरसागर, महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख तेली गल्ली मासिकाचे संपादक मोहन देशमाने, पुणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप शिंदे, श्री. संताजी प्रतिष्ठाण, कोथरूडचे अध्यक्ष रत्नाकर दळवी, पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे, विजय हाडके, दौंड तालुका आध्यक्ष गणेश चव्हाण, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. दीपाताई व्यवहारे, पुणे जिल्हा सचिव राधिकाताई मखामले, पुणे शहर अध्यक्षा सौ. निशाताई करपे , पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धीप्रमुख ललतिा मांजरेकर, कमल सुपेकर, प्रतिभा राऊत, किर्ती शिंदे, सौ. सुवर्णा भगत, महिला आघाडीच्या प्रसिद्धीप्रमुख ललितामांजरेकर, कमल सुपेकर, प्रतिभा राऊत, किर्ती शिंदे, सौ. सुवर्णा भगत , महिला आघाडीच्या दौंड तालुका अध्यक्षा सुलोचनाताई लोखंडे, अप्पर इंदिरानगर शाखेचे अध्यक्ष पोपट गंधाले, सुनील राऊत , माधवराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.