फलटणकर हे फलटनचे यांचे मुळ नाव चिंचकर दुष्काळामुळे गाळाप करण्यास करडी शेंगा नाहित म्हणुन मिरज मार्गे कर्नाटक हुबळी येथे गेले. कै. विष्णु फलटणकर व त्यांच्या वडिलांनी प्रथम आपला तेल घाना सुर केला. हुबळीच्या अक्की होंड पसिरात उद्योगाला चालना मिळाली. आणि ते एका एकी कानडी परिसराचे झाले परंतु नाते संबंध सातारच्या माती बरोबर ठेवले. कै. अनंत (आण्णा) हे एक त्या घराण्यातील कर्तबगार पुरूष यांनीव्यवसायात जम बसवला. त्या ठिकाणी अनंत ऑइल मिल सुरू केली. या व्यवयसायात त्यांनी चांगलाच जम बसवला होता. किमान शंभर कुटूंबबाचे पालन पोषण या व्यापावर अवलंबून होते. ऑईल मिल साठी किमान रोज दोन ट्रक शेंग बी लागत आसे. वर्षाच्या प्रत्येक दिवशी चौवीस तास मिल चालू होती. विक्री व गाळप व्यवस्था स्वत: डोळ्यात तेल घालुन पहात आसत. ही एक सातारकरांची गरूड झेप.