माझा उमेदीचा काळ होता. अगदी लहान होतो तेंव्हा ही पाटणचे कै सिताराम बापू गावात आल्यावर घरी येत. चादरीवर किंवा पोत्यावर बसुन चहा पित. कै. सिताराम बापू व त्यांचे बंधु कै. अबा हे आपले मोठे पण विसरून समाजाचे बनत. ही त्यांची ओळख घाटावर किंवा कोकणात पहावयास मिळत असे. मी विष्णू बाळा पाटील यांच्या विषयी लेखन करीत होतो तेंव्हा 1982 साली त्यांचा प्रथम जवळचा संबंध आला. विष्णु बाळा पाटील यांच्या विषयी पुरक माहिती दिलीच परंतू मला पाटणचे शेडगे समजून घेता आले.
पाटणला पाटणकर सरदार ही एैतिहासिक ठेव. या घराण्याशी यांचे किमान शतकांचे संबंध तल गाळप करणारी ही मंडळी त्यांची विश्वासातील बाजारपेठेतील एक जबाबदार घटक म्हणून पाटणकर त्यांना वागवतात. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू साळुंखे व ते एकाच शाळेत होते. आफळे गुरूजीच्या विचाराने शिक्षीत झाले. बाकी सर्व दुर गेले बापूं पाटण सोडले नाही. तेल गाळप करता करता त्यांचा चळवळी स्वाभावव शांत बसला नाही. 1942 च्या स्वातंत्र संग्रामाच्या वेळी कोयना खोरे भुमीगतांचे अश्रय स्थान होते. या खोर्यात स्वातंत्र्य संग्रमाच्या वेळी कोयना खोरे भुमीगतांचे अश्रय स्थान होते. या खोरत स्वातंत्र्य सेनानी क्रांती सिंह नाना पाटील, स्वातंत्र्य वीर, नागनाथ अण्णा, स्वातंत्र्य सेनानी काशीनाथ देशमुख अशी बरेच स्वातंत्र सैनिक भुमीगत आसत. बापूंचा त्यांच्याशी संबंध आसे. गुप्त बातम्या देणे, त्यांची गुप्त सोय करणे, जेवणाची व्यवस्था करणे बुलेटीण वाटणे पाटण हे तहशील केंद्र असल्याने लोक जागृती साठी सकाळी प्रभात फेरी व सायंकाळी सायंफेरी बाजार पेठेत काढत असत. एक दिवस त्यांच्या सोबत्यांनी ठरवीले सर्वांनी एकत्र येऊन तहशील कचेरी वर तिरंगा फडकावायाचा कै. सिताराम बापू व त्यांच्या सहकारी मित्रांनी तिरंगा फडकवला ही तोच इंग्रजांनी हुकूम दिला. तो हुकम फायरिंगचा होता. सर्वजनांना सुचने प्रमाण पळुन जावयाचे होत. ते सर्वांनी केल ही परंतू या वेळी मंदबुद्धीचा एक ग्रामस्थ तेथे सापडला. इंग्रजांनी त्यालाच जबाबदार धरले. बापू स्वातंत्र्य मिळे पर्यंत धडपडत होते.
समाज सेवा ही त्यांची आयुष्याची साठवण पाटणचे पाटणकर हे सरदार हे आमदार ही झाले. बापू त्यासाठी धडपडले. ते एक वेळ नव्हे तर 2/3 वेळा आमदार झाले. बापु त्याच्या जवळचे असुन काही कमवु शकले आसते. परंतू नाही आपणव आपला व्यवसाय बरा बापू मोठे असल्याने सर्व जबाबदार्या होत्या. व्यवसाय करून सर्वांना उभे करणे. शेती, दकानदारी, रेशनींग दुकान या क्षेत्रात त्यांनी जम बसवला. काही काळ ऑईल मिल ही सुरू केली. आणी या बळावर एक प्रमाणीक व्यवसायीक म्हणुन शडगे कुंटूंबीयांची ओळख पारख व कोकणातील चिपळून परिसरात करून दिली. कोकणातील गुहागर चिपळूण येथील बांधवांच्या परिसरात करून दिली. कोकणातील गुहागर, चिपळून येथील बांधवांच्या समस्येला बापु सामोरे त्यामुळे आजही त्यांना शेडगे या घराण्याची ओळख मी अनुभवली आहे बापूंना दोन चिरंजीव 1) कै. चंद्रकांत 2) संजय व आपल्या पुतण्या सह त्यांनी यांना ही जीवनात उभे केले.
स्वातंत्र चळवळीत उडी घेणारे बापु स्वातंत्र्या नंतर राजकारणात शिरले नाहीत. स्वांतत्र्याच्या सहभागतून राजकारण सहज शक्य होते. परंतु त्यात न जाता त्यांनी जसा व्यवसाय पहिला तसा समाज ही पहिला. तेली समाजावर अफाट निष्ठा सुदूंबरे येथे नियमित जात त्यावेळी निवार्याची सोय नव्हती. थंडी वार्यात ते तंबुत विश्रांती घेत. समाज प्रक्रियेत सहभाग घेताना. सामंजस्य पणे आपली अभ्यासपुर्ण मत मांडत. यातुन समाजाला दिशा मिळत होती. नुसती संताजी पुण्यतिथी न करता समाजाला काही तरीदेणे लागतो ही भुमीका समाजाला दिशा देणारी ठरत होती. गरिब व होतकरू विद्यार्थींना दत्तक घेणे ही प्रणाली राबवण्यात बापू आघाडीवर होते. काही विद्यार्थीना त्यांनी दत्तक ही घेतले. शिक्षण समिती द्वारे गरिब होतकरू विद्यार्थीना मदत मिळावी या साठी त्यांनी समिती सदस्या सह महाराष्ट्र दौरे केले. आगदी सरूवातीला प्रतिसाथ कमी मिळत हेता. परंतू बांपूची मधूर भाषा, नम्रता यातुन निधी संकलनास चालना मिळाली काही दशके जी मदत मिळत होती जे शिल्पकार होते त्या पैकी बापू एक होते. ते एक वर्ष उत्सव उदघाटक ही होते. सातारा जिल्ह्यात दोन पोटशाखा या पोटशाखेत बापू सर्वांचे होते लिंगायत व तिळवण हा प्रकार त्यांना जमत नव्हता. आपल तेल गाळप करतो तेंव्हा सर्व तेली एक आहोत. 1980 च्या दरम्यान कै. रामभाऊ मेरूकर, कै. माधवराव धोत्र, बारवडे वकिल यांना घेऊन त्यांनी समस्त सातारा जिल्हा संघ ही संघटना बांधली होती. येथे भविष्यात जी समाजाची जडण घडण झाली त्याची ही पाऊलवाट त्यांनी निर्माण केली संताजी पुण्यतिथी व बसवेश्वर जयंती ही बापूंची साठवण होती.
कै. सिताराम बापूंचे मोठे चिरंजीव कै. चंद्रकांत हे व्यवसायात लक्ष देत होते नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. श्री. संजय शेडगे यांनी कै. बापूंच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यास खर्या अर्थाने गेली 7/8 वर्ष धडपड सुर केली आहे. प्रथम काही वर्ष पाटण येथे संत संताजी पुण्यतीथी साजरी करीत होते. या मध्ये सहभाग घेतला. सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने मतभेद आसतात तसे इथे ही होते. परंतू जिल्हा संघटने तर्फे विश्वास देऊन भेद नष्टे केले. समाजाच्या प्रक्रियेत सामील झाले. वाद व भेद या पासून दूर राहून जे चांगले आहे फक्त तेवढेच अत्मसाथ केले. त्यामुळे एक नवीन नेतृत्व समोर आले महाराष्ट्र तेली महासभेने त्यांना सातारा जिल्हा अध्यक्षपद दिले. सातारच्या मातीत कसे काय करावे याचे ठोकताळे असल्याने सर्व पोटशाखाना बरोबर घेऊन त्यांनी पावले उचलली त्यामुळे कोयना नगर येथे पोकळ चिंतन शिबीर न घेता कार्यकर्तेा प्रशिक्षण शिबीर घेतले. कार्यकर्ते तयार झाले सातारा जिलह्यातील सर्व तेली समाजाची जणगणना हा उपक्रम त्यांनी यशस्वी पणे राबवला. त्याची पुस्तीका ही पुर्ण कोयनानगर नंतर जे वादळ उठले. त्यावेळी त्यांनी समाजाच्या अस्मितेला धक्का लाव नये भुमीका घेतली. जिल्हा अध्यक्ष पदा पेक्षा त्यांनी माझा साधा, सरळ व निष्ठावान समाज मोठा ही भुमीका श्रेष्ठ ठरली. तेली समाज संस्था आहेत. आणी जेंव्हा तेली महासभा त्या शहरात गेली तेंव्हा तिचे रूपांतर स्थानिक संस्थेच्या मतभेदात झाले आहे. परंतु श्री. संजय शेडगे यांनी स्थानिक जिल्हा संस्थेशी समन्वय ठेऊन कार्य सुर ठेवले आहे. शेडगे कुटूंबीयांच्या विषयी वेळे अभावी एवढेच सांगता येईल की पाटणकर सरदार की ज्यांच्या घरात इतिहास आहे. भुगोल आहे. आणि जवळचे संबंध असताना ही त्या शिडीवरून ते सर सर चढले नाहीत तर ते प्रेम तो विश्वास साठवण ठेऊन वाटचाल करतात समाज निष्ठा, समाज प्रेम, समाजास त्याग, समाज सेव ही कै. सिताराम शेडगे यांची गंगाजळी श्री. संजय शेडगे यांनी वाढवली.