श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली. लहानपणापासुनच कष्ट करत करतच ते पुढे वाटचाल करीत होते. पुढील शिक्षणासाठी सातारा येथे आले परंतु 9 वी मध्ये शिक्षण बंद करावे लागले व कुटुंबासाठी त्यांनी चुलते श्री. शांताराम दळवी यांच्या सातारा येथील दुकानात 60 रू महिना पगारावर नोकरी करण्यास सुरूवात केली. काही दिवस तिथे काम केले. नंतर पुणे येथील श्री. बाबुराव शिवराम धोत्रे यांची जेष्ठ कन्या व श्री. रामदास धोत्रे यांच्या भगिनी सुनीता यांच्याशी 1972 साली त्यांचा विवाह पार पडला. त्यानंतर बंधु व वडीलांच्या मदतीने त्यांनी व्यवसाय वाढवला. पत्नी सौ. सुनीता यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. ंनंतर प्रयत्न करून त्यांनी सरकारमान्य दारु दुकानाचे लायसन्स मिळविले. आपल्या चुलत्यांच्या ऋणांची परतफेड म्हणुन एक लायसन्स परळी येथे दिल व दुसरे स्वत:साठी आनेवाडी या गावात मिळाले. तिथ अनेक वर्षे सचोटिने व्यवसाय केला. गावातील लोकांना मदत करणयात ते पुढे असत.
व्यवसाय करत असताना सामाजिक कार्यही चालु होतेच. आनेवाडी येथे बालवाडीसाठी 1 गुंठा जमीन त्यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. विद्यादानाच्या पवित्र कार्यास हातभार लावला. विविध संस्थाा, शाळा, मंदिरांनांही वेळोवेळी मदत केली व सामाजिक बांधिलकी जपली.
हे करताना आपल्या परळी या गावाला ते विसरले नाहीत तेथे ही त्यांनी मोफत मोतिबिंदू शस्त्र्रक्रिया शिबिर आयोजित केले. सामान्य परिस्थिती असणार्या व शस्त्रक्रीयेचा खर्च करू न शकणार्या 38 लोकांना याचा लाभ झाला. मा. अभयसिंह महाराजांच्या हस्ते मोफत चष्मेवाटपही करण्यात आले.
तेली समाजाचे काळोजी महाराज यांच्या 50 प्रतिमांचे मोफत वाटपही केले. सातारा जिल्हा तिळवण तेली समाजाचेउपाध्यक्ष पद 10 वर्षे भुषविले अखिल भारतीय तैलिक महासंघाचे 10 वर्षे जिल्हा अध्यक्षपद तसेच आता प. महाराष्ट्राचे उपाध्यक्षपद यशस्वीपणे भुषवित आहेत. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात 13 यशस्वी वधुवर मेळावे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
सातारा येथे त्यांचे गरममसाला व ड्राय फ्रुटसंचे दुकान आहे. मुले श्री सचिन व श्री तेजस यशस्वी पणे व्यवसाय सांभाळतात तर सौ. आरती व सौ. दिप्ती या त्यांच्या स्नुषा आहेत. कन्या भारती फल्ले या पुण्यात पार्लर चा व्यवसाय सांभाळतात तर द्वितीय कन्या गीता भोज शेअर मार्केट सांभाळून क्लास घेतात धाकट्या कन्या सौ. प्रनिता देवमाने या मुंबई येथे मंत्रालयात कार्यरथ आहेत.
या शिवाय वधुवरांचे विवाह जमविण्यात मदत करण्यास ते कायम तत्पर असतात. सर्व समाजबाधवांना ते कायम मदत करतात. कष्टांतुन पुढे आल्यामुळे समाजिक बांधिलकी त्यांच्यासाठी सर्वांत महत्वाची आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!