परळी येथील कै. शांताराम दळवी यांनी 1983 मध्ये गावकुस अंक काढण्यासाठी पहिली जहिरात रोख स्वरूपात दिली. त्यामुळे तेली गल्ली मासिकाची पाळे मुळे होत. शांताराम दळवी कमी शिकलेले परंतु मरब्बी व्यवसायीक त्यांनी त्या परिसरात मंगलोरी कोले, बांधकामाचे साहित्याची विक्री सुरू केली. हाच व्यवसाय सातारा येथे मोठ्या स्वरपात सुर ठेवला. एक व्यवसाय म्हणुन देशी दारुचे शासन मान्य दुकान सुरू केले. वेगवेगळ्या व्यवसायात घौडदोड करिताना आपल्या नात्यातील होतकरू युवकांना जवळ केले त्याच्यांवर जबाबदार्या देऊन त्यांचे व्यवसाय उभे केले. त्यांचे चिरंजीव सोमनाथ हे अपंग पण या अपंगत्वावर मात करीत त्यांनी अगदी पडत्या काळात सर्व व्यवसाय संभाळले. आज सज्जनगडाच्या पायथ्याला आनंदी नावाचे हॉटेल सुरु केले आहे. श्री. सोमनाथ यांचा समाज कारण राजकारणच पिंड यामुळेच त परळी गावचे सरपंच ही होते. गावाच्या विकासात सहभाग घेतात. तेली समाजाचे संघटन व्हावे या धडपडीतुन त्यांनी वाटचाल केली. सातारा समाज संस्थेने वधुवर मेळावे ही संकल्पना रूढ करिताना त्यांनी हवी ती मदत दिली एक वेळ ते मेळावा अध्यक्ष होते. तेली गल्ली या मासिकाच्या धडपडीला त्यांचा हातभार आसतोच.