सोमेश्वर नगर येथिल महाविद्यालयात तेलघाना अडगळीत गेला म्हणुन विठ्ठल पांडूरंग वाईकर यांनी शिपायाची नोकरी स्विकारली त्यांना एकुण 6 मुल. या मुलांचा संभाळत या नोकरीवर करीत. घरी येऊन गावात केरासीन विकत. या विक्री साठी घरातील सर्व सहकार्य करीत. मोठ्या चिरंजीवानी रॉकेल विक्रीला चांगले रुप दिले. प्रचलीत असलेल्या शासकीय नेमांचा आधार घेऊन ते व्यवासाय करीत होते. त्यामुळे तेल व्यवसायाशी जवळचा संबध आला. सातारा येथील दिपक प्रल्हाद इंगळे यांचा संबंध होता. त्यांचा फलटण जवळ बरड येथे पेट्रोल पंप होता. हा पंप चालत नव्हता उलट तोट्यात होता. त्यांना तो विश्वासू व्यवसायाकाला चलवण्यास द्यायचा होता. त्यांचया समोर तरडगाव येथील वाईकर बंधु होते. त्यांनी विचारणा केली थोडा विचार घेऊन तो पंप चालवण्यास घेतला श्री. मुकेश वाईकर नुकतेच 76 टक्के मार्क घेऊन 12 वी पास झाले होते. शिक्षणाची उमेद होती. तसे नाव ही दाखल केले होते. परंतु जीवनाची नवी वाट समोर येताच त्यावर ते उभे राहिले त्यामुळे शिक्षण एस.वाय. पर्यंतच झाले.
कै. वाईकर यांना सहा मुले मोहन, अनिल, अजीत, संजय, राजेंद्र, मुकेश. हे मुकेश सर्वात लहान बरड येथे बंद पडलेला पेट्रोल पंप चलविण्यास घेतला नंतर तो प्रथम नफ्यात आणला. पेट्राल पंप मंजूरी चालवणे ही जी एक यंत्रणा ती पुर्ण समजावून घेतली. यातुनच वाईकर घराण्यात पेट्रोल पंपाची मालीका केली. आज 6 पंप वाईकरांचे आहेत. विभक्त कुटूंब झालयावर श्री. मुकेश यांच्याकडे तरडगांव येथील पंप आला. या पंपावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. थोड्याच दिवसात जेजूरी येथे ही पेट्रोल पंप सुरू केला. त्यांनतर निरा येथे ही सुरवात केली. गावात रॉकेल विकणारे वाईकर आज पुणे ते पंढरपूर मार्गावर पेट्रोल पंपाच्या साखळीच मालक झाल आहेत श्री मकेश हे धडपड, नुसती धडपड नाही तर व्यवसायतील बारकावे नफा तोटा, कामगारांच्या पळवाटा, शासकीय नियम यांचे बारकावे अभ्यासुन वाटचालकरणारे बांधव या मुळे वाहातुक हा व्यवसाय समजुन घेऊन त्या ही क्षेत्रात त्यांनी उडी घेतली रस्ते बांधणी घरे बांधणे या क्षेत्राला आज बरे दिवस आहेत. हे ओळखून वाल्हे ता. पुरंदर येथे स्टोन क्रशर सुर केला., खडी, वाळू याची निर्मीती करून ते पुरवू लागले. या नविन व्वसायात ही त्यांनी चांगलाच जम बसवला आहे.
नुसता व्यवसाय, नुसता नफा तोटा. नुसती स्वत:ची प्रगती हा ध्यास न ठेवता. मी माझ्या समाजात जन्मलो मग माझे ही काही कर्तव्य आहे याची पुरती जाणीव त्यांच्याकडे आहे. सातारा येथिल समाजाच्या वधु -वर मेळाव्याची अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. त्यांनी या संस्थेला मदतीचा हात ही दिला. त्यांच्याकडे मी गेल्यावर त्यांना विचारले किमान 100 तरी कामगार तुमचयाकडे आहेत. यात समाज बांधव किती ? तेंव्हा त्यांनी उपस्थीत कामगारांना माझ्या समोर उभे केले. जसे ते आपली नाव सांगू लागले. तस तसा नात्याचा धागा सापडत गेला. मी स्थीर झालो माझे बांधव उभे राहिले पाहिजेत ही समाजाची निष्ठा समोर आली. श्री. संत संताजी महाराजांच्या पालखीचा मुक्काम तरडगावमध्ये असताना तो त्यांच्या पेट्राल पंपवारच आसतो. त्या दिवशी सर्व व्यवस्थापन करून पालखी सोहळ्यास मदत ही करतात. तरडगावातील नवरात्र उत्सव यात ते सक्रिय असतात.
सामेश्वर नगर येथे काकडे कॉलेज मध्ये शिपाई काम करणार्या वाईकर मुले आज जिद्द, धडपड व हुशारी या बळावर सर्वा पुढे गेले. यात श्री. मुकेश वाईकर यांनी शिखर पकडले. त्यांना चि. मानस व चि. हिमांशु ही मुले या मुलांच्या नावा वरुन त्यांनी आपल्या पेट्रोल पंपाना माही हे नाव दिल आहे.