या समाजाचा तेल बिया गाळप हा परंपरेचा व्यवसाय. तेल बी खरेदी गाळप उत्पादक माल विक्री. व्यवस्था तशी व्यापारी वृत्तीची या समाजात असे ही काही बांधव होऊन गेल की त्यांनी पिड्यान पिड्या मोठा व्यवसाय करणार्या किंवा व्यवसायाचे शंभर टक्के आरक्षण असलेल्या व्यपार्यांनाही मागे सारले. ही किमया कोरेगाव येथिल कै. काशिनाथ तुकाराम विरकर यांना साध्य झालेली होती. जन्म कोरेगाव येथे सन 1902 मध्ये झालेला घरात बैल घाना. या घानवडीतच लहानपनाचे मोठे झाले. याच परिसरात एकच पिक म्हणजे शेंग पिक. गाळप करता करता ते शेंगा खरेदी व्यवसायात शिरले सन 1923 मध्ये बैल घाना घेता घेता भुसार माल खरेदी विक्री वर लक्ष दिले. त्याचा परिणाम आसा झाला की पुणे व इतर ठिकाणी विश्वासाची पत निर्माण झाली. याच दरम्यान कोरेगांव येथे रेलवे आली. या रेल्वे मुळे देशभर माल पाठवता येऊ लागला. देशभरातला माल येथे येऊ लागला. आणी कोरेगावच्या गाव पणाला व्यापारी केंद्र येऊ लागले मुळ या बाजारपेठेला काशीनाथ विरकर यानावाने सरूवात झाली व देशभर कोरेगावचे विरकर हे नाव मिळाले.
त्या वेळच्या मुंबई राज्यत दामाजी जाधवरावजी घेवार ही एक खरेदी विक्री करणारी पेढी फार मोठी होती. त्यांची सर्व सुत्र हुबळी, जि. धारवाड येथून सुरू होते. भुसार मालाचे आमाप पिक सातारा, खटाव, मान, खंडाळा, वाई, जावली या तालुक्यातुन होत हेते. वीरकरांचे खरेदीचे जाळे होते. व्यापारातील एक तज्ञ म्हणुन दामाजी यांनी वीरकरांना ओळखले. त्यांनी काशीनाथ विरकरांना सोबत घेतले. 1934 मध्ये सातारा परिसरातील पहिली ऑईल मिल काशीनाथ यांनी सुर केली. शेंग खरेदी करन गाळप करावयाचे तेल पेंडीचे उत्पादक म्हणुन सर्वत्र परिचय होऊ लागला. दिवसातुन 24 तास मिल चालु आसे. वर्षातुन दिपावली पुर्वी एक दिवस मिल बंद आसे. अन्यथा ती आहोरात्र गाळप करित आसे. तेल पेंड ही स्थानीक पातळीची गरज भागुन देशभर पाठवली जात होती. कोरेगाव परिसरातून धना, मराठवाड्यातुन करडी, करडी पेंड, ज्वारी खरेदी केली जात आसे. मिर्ची ही खरेदी होत होती. गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी माल जात आसे. तेथे माल खरेदी करून इकडे आणला जात आसे. त्याची होलसेल विक्री होत होती. यासाठी वहातुक बहुतेक रेल्वे व इतर वहानानी होत होती. एकट्या काशीनाथरावांच्या मुळे कोरेगाव ही एक तालुक्याची नव्हे तर सातारा जिलह्याची बाजारपेठ निर्माण झाली होती. अफाट व्यवसायीक पण अत्मसाथ करणारे हे आगदी दिल्ली पर्यंत त्यांचा व्यापार पोहच झाला होता. स्वातंत्रयाच्या पुर्वी अनेक स्वातंत्र्य सैनिक क्रांतीसिंह नाना पाटलांचे सोबती यांना ही त्यांनी आपला मदतीचा हात दिला होता.
स्वातंत्र्या नंतर पुर्ण जिल्ह्यात आर्थिक बलवान ज्या व्यक्ती पहिल्या दहा होत्या त्यात कै. काशीनाथ विरकर यांचा नंबर होता यशवंतराव चव्हाणाबरोबर मैत्री पुर्ण संबंध होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅक उभी करण्यास वीरकरांचा सहभाग, कारण बँक सुरू करण्यास पैसेच नसत आशा वेळी वीरकरांची मुदत ठेवी ठेऊन बँका सरु करून दिली. सहकारी बँकांची राज्य सहकारी बँकेचे फार मोजके सभासद त्या मध्ये कै. काशीनाथ तुकाराम विरकर एक होते. आजच्या स्वातंत्राला सहकार्य करणारे विरकर आजच्या सहकार प्रणालीला उभे करणारे वीरकर, आजचा कोरेगाव बाजार पेठेला उभे करणारे वीरकर. पुर्ण राज्यातील बाजार पेठेत जुन्या काळातील मोठे व्यापारी म्हणुन वयोवृद्ध सांगतात कोरेगावचे वीरकर असा हा व्यपारातील महामेरू काळानरूप गेले. परंतु यशाच्या खुणा जागो जागी ठेवत.