चंद्रवदन बाबुराव चौधरी उर्फ आबासाहेब यांचे नाव ऐकताच नजरेसमोर कानुमाता व सप्तशृंगी देवीचे चित्र उभे राहते. शिरपूर येथील रहिवासी असलेले आबासाहेब यांचे धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.सप्तशृंगी माता व कानु मातेचे अनेक गाणे त्यांनी स्वतः लिहून त्याचे चित्रीकरण केले आहे.अनेक सुप्रसिद्ध गाणे व कॅसेट आबासाहेबांच्या नावावर आहेत.नुकतेच तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी, संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांवर देखील त्यांनी गाण्यांचे चित्रीकरण केले आहे.
गायन क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले आबासाहेब तेली समाजात देखील विविध कार्यक्रमात अग्रेसर असतात.समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. दरवर्षी ते मोठ्या प्रमाणावर भक्तांना सोबत घेऊन शिरपूर ते नांदुरी गड अशी पदयात्रा करतात.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गीतकार, गायक, कलाकार सप्तशृंगी व कानू मातेचे सच्चा भक्त असलेल्या आबासाहेबांना खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने "समाज सारथी" पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते समाज सारथी पुरस्कार देऊन आबासाहेबांना गौरवण्यात येईल असे मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी,सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी,धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी,धुळे शहर सचिव राकेश पुंडलीक चौधरी, धुळे शहर कार्याध्यक्ष अमोल हिरामण चौधरी, धुळे तालुका अध्यक्ष भटू पुंडलीक चौधरी, शिरपूर तालुका अध्यक्ष दिनेश अशोक चौधरी, शिरपूर शहर अध्यक्ष नरेंद्र सुदाम चौधरी,दोंडाईचा शहराध्यक्ष संदीप सुदाम चौधरी, शिंदखेडा तालुका अध्यक्ष सुनील हिराचंद चौधरी, साक्री तालुका अध्यक्ष गणेश दिलीप चौधरी,युवा आघाडीचे प्रमुख सुनील दिलीप चौधरी नेर, धुळे तालुका कार्याध्यक्ष सुनील भाऊ चौधरी बोरकुंड, गजेंद्र फुलचंद चौधरी, शशिकांत बळीराम चौधरी, वाल्मीक दगाजी महाले, मुकेश श्रीराम चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, महेश दौलत चौधरी व पदाधिकारी यांनी कळवले आहे.