आपला समाज मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न समाजातील काही प्रामाणिक कार्यकर्ते करत आहेत. परंतु सामान्य कार्यकर्त्याला आपल्या समाजात स्थान नाही. यात धनदांडग्यांना फक्त खुर्चीचा हव्यास आहे. खुर्चीसाठी काय पण करायला तयार होतात. समाजात खरी कोणती गरज आहे याकडे यांचे आजिबात लक्ष नाही. कोणाला यातून राजकीय फायदा करून घ्यायचा असतो. तर कोणाला नाव मोठे होण्याचे स्वप्न असते. तळागाळातील समाजाकडे कधी हे लोक ढुंकूनही पाहत नाहीत. मोठ्यांच्या कार्यक्रमांना हे लोक आवर्जून हजेरी लावतात. पण एखाद्या गरिबाघरचे कार्य असेल तर या लोकांना वेळ श्री. रामदनसतो. पण तेच जर मोठ्या उद्योगपतीच्या घरचे कार्य असेल तर हे लोक हातातील सर्व कामे बाजुला ठेवून हजेरी लावतात. सध्या समाजात श्री. संताजी सेना ही संघटना सुरू झाली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री. सचिनदादा भागवत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रा. किशोर चौधरी. उपाध्यक्ष आहेत ास धोत्रे. या संघटनेचे कार्य पुर्णपणे नि:स्वार्थी व तळागाळातील समाजघटकाला डोळ्यासमोर ठेवून चालू आहे. सध्या संताजी सेनेचे कार्य ३६ जिल्हयांमध्ये विस्तारले आहे. नुकताच मालेगाव येथे राज्यस्तरीय कार्यकता्र मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यादरम्यान १० गरजू समाजबाधवांना रिक्षावाटप करीण्यात आले. पुणे जिल्ह्यातही पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. रमेशा भोज यांच्या माध्यमातून श्री. हनुमंत तोडरमल या रिक्षाचालकाला या योजनेचा लाभ मिळाला.
<p>महिलांसाठीही विविध योजना राबविणार असल्याचे श्री. सचिनदादा भागवत यांना सांगितले. या योजनेत रिक्षाचालकांना श्री संताजी सेनेतर्फे २५ % अनुदान देण्यात आले. उर्वरीत रक्कम ही लाभार्थीने भरावयाची असते. या मेळाव्याला पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी तेली गल्ली मासिकाचे संपादक श्री मोहन देशमाने यांची महाराष्ट्राच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. श्री. रमेश भोज हे पुणे जिल्ह्यातून सर्वोत्कष्ट समाजकार्य केल्याने ३६ जिल्ह्यांमधून प्रथम क्रमांकाचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. रमेश भोज यांना रू. ५१ हजारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल भोज यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. आपल्या समाजातील गोरगरिबांसाठी, गरजूंसाठी काही तरी करण्याची जिद्द भोज यांच्यामध्ये आहे. परंतु काही धनदांडगे या समाजसेवेत अडथळा आणू पाहात आहेत. परंतु कशालाही न जुमानता श्री. रमेश भोज यांचे कार्य जोमात सुरू आहे. तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष व्हावळ, पुणे जिल्हा सचिव अनिल घाटकर, पुणे जिल्हा प्रवक्ते अशोक सोनवणे, पुणे शहराध्यक्ष माऊली व्हावळ, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिलीप शिंदे, पुणे शहर उपाध्यक्ष अनिल उबाळे, विजय हाडके, महेश अंबिके, अभिजित देशमाने, प्रीतमशेठ केदारी, कृश्णा भादेकर, पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख महेश फलटणकर, पुणे शहर संघटक पंडित चौधरी, शामराव भगत,. पुणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. दीपाताई व्वहारे, पुणे जिल्हा सचिव राधिकाताई मखामले, पुणे शहर अध्यक्षा सा. निाशाताई करपे , पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धीप्रमुख ललिता मांजरेरकर, कमल सुपेकर यांच्या सहकार्याने पुणे जिल्हयात आतापर्यंत किमान ३७ शाखा स्थापन झाल्या आहेत. अप्पर इंदिरानगर (बिबवेवाडी) येथे प्रथम शाखा स्थापन रिण्यात आली. ही संताजी सेना समाजातील तळागाळातील समाजबांधवांसाठी विविध योजना राबवित आहे.
भविष्यात तरूणांना रोजगार मिळवून देणार्या विविध योजना राबविण्याचा मानस या संताजी सेनेचा आहे. संताजी सेनेची गोपालन योजनाही सुरू आहे. समाजातील ग्रामीणा भागातून ही योजना चांगल्याप्रकारे राबविता येऊ शकते. ग्रामीण भागातील तरूणांनी या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्याकडे गायी सांभाळण्याची क्षमता असेल, यासाठी जागा उपलब्ध असेल तर जरूर या योजनेचा लाभ घ्यावा.